शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
3
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
4
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
6
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
8
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
9
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
12
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
13
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
14
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
15
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
16
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
17
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
18
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
19
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
20
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...

लाचखोर अभियंता जाळ्यात

By admin | Updated: June 11, 2014 23:17 IST

रस्ता बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी ५० हजार रुपयांसह टीव्ही व गॅस कनेक्शन मागणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यास लाचलुचपत प्रतीबंधक विभागाच्या पथकाने

पैशासह गॅसची मागणी : घरझडती व बँकेत ९७ लाखगोंदिया : रस्ता बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी ५० हजार रुपयांसह टीव्ही व गॅस कनेक्शन मागणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यास लाचलुचपत प्रतीबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. येथील लोहिया वॉर्ड परिसरातील अभियंता दीपक पऱ्हाटे याच्या घरी बुधवारी (दि.११) सकाळी ९.४० वाजता ही कारवाई करण्यात आली. यानंतर सदर पथकाला अभियंत्याच्या चंद्रपूर येथील घरातून रोख तसेच गोंदिया व चंद्रपूर येथील बँक खात्यात ९६ लाख ८८ हजार ६७० रूपयांची रक्कम मिळून आली आहे. सविस्तर असे की, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागांतर्गत धापेवाडा- अत्री-बोदा-सेजगाव या रस्त्याच्या खडीकरणाचे चार लाख रूपयांचे कंत्राट कोसमतर्रा (सालेकसा) येथील ओम शांती मजूर सहकारी संस्थेला मंजूर केले होते. संस्थेने हे काम पूर्ण करण्यासाठी एका कंत्राटदारास दिले व स्वत:चे पैसे लाऊन हे काम केले. या कामाचा एक लाख ३३ हजार रूपयांचा पहिला धनादेश कंत्राटदाराला मिळाला आहे. मात्र उर्वरीत बिल मंजूर करून देण्यासाठी अभियंता दीपक पऱ्हाटे यांनी कंत्राटदारास निघालेल्या बिलाचा मोबदला व उर्वरीत बिलाचे असे मिळून एक लाख रूपयांची मागणी केली. या प्रकरणाला घेऊन कंत्राटदार व अभियंता पऱ्हाटे यांच्यात मागील सहा महिन्यांपासून वाद सुरू होता. अखेर कंत्राटदाराने २९ मे रोजी लाचलुचपत प्रतीबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली. त्यानंतर ३ जून रोजी ५० हजार रूपये रोख, १८ हजार रूपये किमतीचा एक टिव्ही व सात हजार रूपये किमतीचे गॅस कनेक्शन देण्याबाबत दोघांत बोलणी झाली. ठरल्यानुसार कंत्राटदार ११ जून रोजी सकाळी ९.४० वाजतादरम्यान अभियंता पऱ्हाटे यांच्या लोहिया वॉर्ड येथील निवासस्थानी रोख ५० हजार रूपये व गॅस कनेक्शन (सिलेंडर, शेगडी व कागदपत्र) घेऊन गेला. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने अभियंता पऱ्हाटे यास गॅस कनेक्शन घेत असताना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे येथील पथकाने दिलेल्या माहितीवरून, चंद्रपूरच्या एसीबी पथकाने देखील पऱ्हाटेंच्या रामनगर मधील विदर्भ हाऊसींग सोसायटीतील घरावर धाड घातली. या धाडीत पथकाला घरझडतीत ६६ लाख ९५ हजार रूपये रोख मिळून आले. पऱ्हाटे यांच्या स्टेट बँकेच्या गोंदिया शाखेतील खात्यात १४ लाख ५७ हजार २९२ रूपये तसेच चंद्रपूर येथील खात्यात १५ लाख ३६ हजार ३७८ रूपये मिळून आले असून खाते सील करण्यात आले आहे. पथकाने पऱ्हाटे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अधिकची संपत्ती मिळण्याची शक्यता असल्याने झडती सुरू असल्याची माहिती एसीबीचे उपअधीक्षक दीनकर ठोसरे यांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत शिरभाते, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, हवालदार गोपाल गिऱ्हेपुंजे, ब्रिजकिशोर तिवारी, शिपाई राजेश शेंदे्र, दीपक दत्ता व पथकाने यशस्वी केली. (शहर प्रतिनिधी)