शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकी महिलांचे नऊ दिवसांपासून धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:36 IST

आपल्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालीका शाळेतील स्वयंपकी महिला संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. सदर धरणे आंदोलन मागील नऊ दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : आंदोलन सुरूच ठेवण्याचा संकल्प, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालीका शाळेतील स्वयंपकी महिला संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. सदर धरणे आंदोलन मागील नऊ दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू आहे.या आंदोलनात जिल्हाभरातील स्वयंपाकी महिलांचा सहभाग आहे. हे आंदोलन २२ आॅक्टोबरपासून सुरू असून ३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. आंदोलनाचा मंगळवारी (दि.३०) नववा दिवस आहे.शालेय पोषण आहार शिजविण्यासह शाळेतील इतर कामे करणाऱ्या स्वयंपाकी महिलांना फक्त १ हजार रूपये मानधनावर काम करावे लागते. ते मानधन ५-५ महिने मिळत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचे जेवण तयार करणाऱ्या स्वयंपाकीन महिला उपाशी राहण्याची पाळी आली आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांना घेऊन त्यांनी जिल्हा परिषदवर मोर्चा काढून मागील नऊ दिवसापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.स्वयंपाकीन महिलांना १० महिन्याऐवजी १२ महिन्याचे वेतन द्यावे, दरारोज २०० रूपये प्रमाणे मानधन द्यावे, किमान वेतन कायद्यांतर्गत किमान वेतन लागू करण्यात यावे,स्वयंपाकी महिलांना कायम करण्यात यावे, नव्याने स्वयंपाकीन महिलांची नियुक्ती शासनाने करावी, एखाद्या ठिकाणची विद्यार्थी संख्या कमी झाल्यास त्या ठिकाणच्या स्वयंपाकी महिलेला दुसºया शाळेत हलविण्यात यावे, या मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्त्व जिल्हाध्यक्ष चंदा दमाहे, कार्याध्यक्ष मनोज दमाहे, शिवनाथ खरोले, प्रमिला राऊत, प्रतिभा बडगे, सुनिता पाऊलझगडे, देवका नरेश बहेकार, गीता सोनवाने,भोजराम वाढई, सरीता उके यांनी केले. जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा संकल्प स्वंयपाकी महिलांनी केला आहे.दरम्यान नऊ दिवसांपासून स्वंयपाकी महिलांचे आंदोलन सुरू असून त्याची अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये रोष व्याप्त आहे.

टॅग्स :Strikeसंप