शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

पोहा मिलच्या धुराने गुदमरतोय श्वास

By admin | Updated: January 7, 2015 22:55 IST

येथील प्रधान मोहल्यात मागील २० वर्षापासून सुरु असलेल्या पोहा मिलच्या प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्रदुषणामुळे परिसरातील

नवेगावबांध : येथील प्रधान मोहल्यात मागील २० वर्षापासून सुरु असलेल्या पोहा मिलच्या प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्रदुषणामुळे परिसरातील अनेकांना फुफ्फुसाचे आजार होत असल्याची चर्चा देखील गावात सुरु आहे.सविस्तर वृत्त असे की, मागील सुमारे २० वर्षापासून नवेगावबांध येथील प्रधान मोहल्यात पोहा मिल सुरु आहे. मिलमधून निघणारा धूर आणि राखेची धुळ याचे आजतागायत योग्य व्यवस्थापन करण्यात आलेले नाही. शासनाचे निकषानुसार औद्योगीक व्यवसायीक भट्टींना चिमणी लावणे अनिवार्य आहे. त्या चिमणांची उंची ४६ फुट असावी असेही ऐकिवात आहे. त्यामध्ये ‘मेकॅनिकल डस्ट कलेक्टर’ लावणे देखील अनिवार्य आहे. परंतु शासनाच्या निकषांची अजुनही पुर्तता करण्यात आली नाही. स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केली होती, परंतु कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत देखील मुकदर्शकाची भूमिका बजावत असल्याचा आरोप होत आहे.मिलच्या परिसरात बहुसंख्य मजूरवर्ग राहत असल्याकारणाने त्यांचा आवाज दाबण्याचा सतत प्रयत्न केला जातो. हेतुपरस्पर कारवाई टाळण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे आतातरी या पोहामीलच्या प्रदुषणाचे शासकीय नियमानूसार व्यवस्थापन करण्याचे निर्देश देण्यात यावे किंवा सदर मिल गावाबाहेर काढावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.जिल्ह्यात प्रदुषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय नाही. गेल्या १४ वर्षांपासून या कार्यालयाचा कारभार भंडारा येथूनच सुरू आहे. आता पालकमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेऊन हे कार्यालय गोंदियात आणल्यास अनेक समस्या दूर होतील. (वार्ताहर)