शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:27 IST

कपिल केकत गोंदिया : वाहन चालविण्यासाठी काही नियम ठरवून देण्यात आले असून ते नियम वाहन चालविणाऱ्या व्यक्तीसह पुढील व्यक्तीच्या ...

कपिल केकत

गोंदिया : वाहन चालविण्यासाठी काही नियम ठरवून देण्यात आले असून ते नियम वाहन चालविणाऱ्या व्यक्तीसह पुढील व्यक्तीच्या सुरक्षेसाठीही आहेत. मात्र असे असतानाही कित्येकांकडून नियमांना तोडून वाहन चालविले जाते व त्याचे परिणाम अपघाताच्या रूपात पुढे येतात. यात कित्येकदा हे अपघात जीवावर बेततात व ज्यात वाहन चालविणाऱ्यासह पुढील व्यक्तीचाही जीव जातो. यामुळेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र एवढ्यावरच पुरेसे नसून वारंवार नियमांना तोडणाऱ्यांचे नाईलाजास्तव लायसन्सही वाहतूक नियंत्रण शाखेकडून रद्द केले जातात. म्हणूनच वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेची नजर असून नियम तोडल्यास लायसन्स रद्द होऊ शकते.

----------------------------------

चार वर्षांत झालेली कारवाई

वर्ष लायसन्स निलंबन

२०१८- १७९

२०१९- ६७

२०२०- ००

२०२१ - ००

----------------------------

हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन

- वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे तसेच अतिवेगात वाहन चालविल्यास लायसन्स रद्द केले जाऊ शकते.

- मद्यप्राशन, अंमली पदार्थांचे सेवन करून तसेच सिग्नल तोडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास लायसन्स रद्द केले जाऊ शकते.

- मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक तसेच अवैधरित्या प्रवासी वाहतूक करीत असल्यास लायसन्स रद्द केले जाऊ शकते.

----------------------

आधी मुदत नंतर कारवाई

एखाद्याकडून नियमांचे वाहतूक नियमाचे उल्लंघन झाल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र त्यानंतरही वारंवार ती व्यक्ती वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असेल तर मात्र अशाला ठराविक कालवधीसाठी मुदत दिली जाते. मात्र त्यानंतरही काहीच फरक पडत नसल्यास लायसेंस रद्दचीच कारवाई करावी लागते.

------------------------

अशी होते कारवाई...

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या व्यक्तीला २-३ वेळा दंडात्मक कारवाई करून सोडले जाते. मात्र वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास अशा व्यक्तीचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाते. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविला जातो. तेथून परवानगी येताच अशा व्यक्तीचे वाहनही जप्त केले जाते.

------------------

नियमांचे पालन करा...

वाहतुकीचे नियम हे सर्वांच्याच सुरक्षेसाठी आहेत. वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्याला अपघातांच्या रूपात दिसून येतात. यामुळे नियमांचे पालन करूनच नेहमी वाहन चालवा. कारण वाहतूक पोलिसांची तुमच्यावर नजर असून नियम तोडले जात असल्यास कारवाई केली जाणार.

- युवराज हांडे

निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया

५) वाहतूक पोलीस प्रमुखाचा कोट

Regards,

Gajanan Diwan,

Lokmat,

Aurangabad

5 Attachments