शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोकार्पणापूर्वीच इमारतीची भिंत फोडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 21:44 IST

विविध शासकीय विभागांचे कार्यालय एकाच इमारतीत आणण्यासाठी येथील जयस्तंभ चौका लगत कोट्यवधी रुपये खर्चून प्रशासकीय इमारत तयार करण्यात आली. या इमारतीचे अद्यापही लोकार्पण व्हायचे आहे. मात्र त्यापूर्वीच इमारतीची पाईप लाईन चोक झाल्याने भिंती फोडण्याची वेळ आली.

ठळक मुद्देपाईपलाईन झाली चोक : प्रशासकीय इमारत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विविध शासकीय विभागांचे कार्यालय एकाच इमारतीत आणण्यासाठी येथील जयस्तंभ चौका लगत कोट्यवधी रुपये खर्चून प्रशासकीय इमारत तयार करण्यात आली. या इमारतीचे अद्यापही लोकार्पण व्हायचे आहे. मात्र त्यापूर्वीच इमारतीची पाईप लाईन चोक झाल्याने भिंती फोडण्याची वेळ आली. लोकार्पणापूर्वीच ही स्थिती निर्माण झाल्याने बांधकामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.जयस्तंभ चौक परिसरातील जुने तहसील कार्यालय पाडून त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीत शहरात विविध ठिकाणी सुरू भाड्याच्या इमारतीत सुरू असलेले सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी व नागरिकांची पायपीट दूर करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र इमारत बांधकामात काही त्रृट्या राहिल्याने ही इमारत सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. या इमारतीचे लोकार्पण व्हायचे असले तरी या इमारतीत आठ ते दहा विभागाची कार्यालये आली आहेत. इमारतीत ७२ विविध शासकीय विभागासाठी कार्यालये सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी फर्निचर सुध्दा देण्यात आले. मात्र हे फर्निचर सुध्दा निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला होता.अद्यापही या इमारतीत ६० हून अधिक विभागाची शासकीय विभागाची कार्यालये यायची आहेत. मात्र त्यापूर्वीच इमारतीची पाईप लाईन चोक झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला इमारतीची भिंत फोडावी लागली. तीन चार ठिकाणी पिलरची भिंती फोडून पाईप लाईन दुरूस्तीचे काम सोमवारी करण्यात आले.दरम्यान या प्रकारामुळे इमारत बांधकामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.विशेष म्हणजे कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या इमारतीचे लोकार्पण होण्यापूर्वीच ही स्थिती असून सर्व विभागाची कार्यालये या इमारतीत आल्यानंतर काय स्थिती राहिल असा सवालही उपस्थित केला जात आहे.इमारतीचे फायर आॅडिट नाहीमुंबई येथील मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर सर्वच शासकीय इमारतीचे सुरक्षेच्या दृष्टीने फायर आॅडिट करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र या आदेशाला शासनाच्या विविध विभागांकडून खो दिला जात आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे फायर आॅडिटच करण्यात आले नसल्याची बाब पुढे आली आहे. याला गोंदिया नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने सुध्दा दुजोरा दिला आहे. त्यामुळे या नवीन इमारतीत एखाद्या वेळेस आगीची घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.फायर एस्टींग्युशर मुदतबाह्यनवीन प्रशासकीय इमारतीत सुरक्षेच्या दृष्टीने फायर एस्टींग्युशर लावण्यात आले आहे. मात्र ते सुध्दा मुदतबाह्य झाले असून अद्यापही त्यांची रिफीलींग करण्यात आली नाही. या इमारतीत सध्या उपविभागीय कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय,भूमिअभिलेख विभाग, कृषी विभागाचे कार्यालय सुरू झाले आहे. मात्र यानंतरही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वर्चस्वाच्या लढाईत लोकार्पण लांबणीवरनवीन प्रशासकीय इमारतीचे संपूर्ण बांधकाम होऊन इमारत सुसज्ज झाली आहे. या ठिकाणी चार ते पाच विभागाची कार्यालय सुध्दा आली आहेत. मात्र यानंतरही या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले नाही. यामागील कारण दोन राजकीय पक्षातील वर्चस्व आणि श्रेयाची लढाई असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळेच लोकार्पणाचा मुर्हुत निघत नसल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Governmentसरकार