शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘अतिक्रमण हटाओ’ मोहिमेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 20:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अतिक्रमण हटाओ मोहिमेंतर्गत नगर परिषदेने शहरातील कुडवा नाका ते नमाद महाविद्यालय मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र या माहिमेविरोधात दोघांनी न्यायालयात धाव घेतली आहे. यावर न्यायालयाने जैसे थे ठेवण्याचे (स्टेटस-को) आदेश दिले. याप्रकरणी येत्या २५ तारखेला सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत या मोहीमेला ...

ठळक मुद्देदोघांची न्यायालयात धाव : २५ एप्रिलला होणार सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अतिक्रमण हटाओ मोहिमेंतर्गत नगर परिषदेने शहरातील कुडवा नाका ते नमाद महाविद्यालय मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र या माहिमेविरोधात दोघांनी न्यायालयात धाव घेतली आहे. यावर न्यायालयाने जैसे थे ठेवण्याचे (स्टेटस-को) आदेश दिले. याप्रकरणी येत्या २५ तारखेला सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत या मोहीमेला ब्रेक लागला आहे.शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येमुळे शहराचे पुर्णपणे विद्रुपीकरण होत आहे. शहरातील आतील भागाचे तर सोडाच, मात्र मुख्य मार्ग ही अतिक्रमणामुळे अरूंद झाले आहेत. परिणामी शहरात दररोज वाहतुकीच्या कोंडीचे चित्र पाहयला मिळते. शहराची वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या पाहता यावर वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे नगर परिषदेने शहरातील मुख्य मार्गांचे अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.यासाठी भूमी अभिलेख विभागाला मुख्य मार्गांची मोजणी व मार्कींग करण्याचे काम देण्यात आले. भूमी अभिलेख विभागाकडून होत असलेल्या विलंबामुळे अतिक्रमण हटाव मोहीम लांबणीवर पडली होती. त्यानंतर कुडवा नाका ते नमाद महाविद्यालय या मार्गाची मोजणी करण्यात आली. त्यानुसार, नगर परिषदेने २६ मार्च रोजी या मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम हाती घेतली. यात मोहिमेत मार्गावरील काहींचे अतिक्रमण काढण्यात आले. मात्र काही लोकांकडून या मोहिमेला घेऊन चांगलाच गोंधळ घालण्यात आला.विशेष म्हणजे, अतिक्रमण काढण्यात आलेले देवेंद्र यशवंत कावडे (रा.टी.बी.टोली) व बाबुलाल गौतम (रा. बिसेन पेट्रोप पंपच्या मागे) यांनी त्यांच्या अतिक्रमणाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेण्यासाठी २५ तारखेला सुनावणी ठेवली आहे. तोपर्यंत मोहीमेला स्टेटस-को चे आदेश दिले आहे.