शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंच्या बैठकीवर ग्रामसेवकांचा बहिष्कार

By admin | Updated: August 5, 2015 01:53 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला, परंतु शासनाकडून ...

असहकार आंदोलन : प्रलंबित मागण्या निकाली काढाआमगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला, परंतु शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा संघटनेने १ आॅगस्टपासून जिल्ह्यात असहकार आंदोलन सुरू केले आहे. याअंतर्गत संघटनेने पंचायत समितीत आयोजित सीईओंच्या आढावा बैठकीवर बहिष्कार घातला.योगेश रुद्रकार या कर्मऱ्यावर केलेली कारवाई मागे घेऊन त्यांना सेवेत कायम करावे, विस्तार अधिकाऱ्यांची पदे पदोन्नतीने भरावी, आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची तालुकास्तरावर पुरस्कारासाठी निवड करावी, सेवेतील कालबद्ध प्रकरणे निकाली काढावी, अस्थायी ग्रामसेवकांना स्थायी करावे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची सेवाजेष्ठता यादी प्रकाशित करावी, नोव्हेंबर २००५ पूर्वी लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे खाते उघडण्यात यावे, मासिक वेतनाची पुर्तता तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा निधीचे आवरण तत्काळ व्हावे, तेराव्या वित्त आयोगातील खरेदी केलेले प्रिंटर ग्रामपंचायतींना तत्काळ देण्यात यावे, ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे लोकसंख्येच्या प्रमाणात निर्माण करण्यात यावे, आंतर जिल्हा बदली प्रकरणे निकाली काढण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले.संघटनेने मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे लेखी स्वरुपात निवेदन देऊन पाठपुरावा केला. परंतु शासनाने कोणतीच दखल घेतली नाही. या मागण्यांसंदर्भात ग्रामसेवक संघटनांशी साधी चर्चासुद्धा घडवून आणण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे संघटनेने जिल्हास्तरावर १ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यातच संघटनेने मंगळवारी (दि.४) आमगाव पंचायत समिती कार्यालयात आयोजित आढावा बैठकीवर बहिष्कार घातला. (शहर प्रतिनिधी)आंदोलनाचे पडसादग्रामसेवक संघटनेने आमगावपासून सुरु केलेल्या या आंदोलनामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावरील सभा, कामकाजावर त्याचे पडसाद दिसणार आहे. पुढे या संघटनेने ग्रामपंचायतींना ताळेबंद आंदोलने उभारण्याची तयारी केल्याने पदाधिकाऱ्यांनी सांगितले.कामांमध्ये अडथळाग्रामसेवक कर्मचारी संघटनेने मागण्यांच्या पुर्ततेसाठी केलेल्या आंदोलनामुळे गावपातळीवरील विकास कामांना अडथळा निर्माण झाला आहे. गावातील स्वच्छता, आरोग्यासह विविध कामे खोळंबल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची कामेही अडून पडली आहेत.