शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

दोघी मायलेकी जपतात हौशी नाट्य परंपरा

By admin | Updated: February 19, 2017 00:09 IST

मानसाने जीवनात एकतरी लहान-मोठा धंद जोपासला पाहीजे असे म्हणतात. सार्वजनिक जीवनात अनेक जण कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता

झाडीपट्टीतील कलावंत : ऐतिहासिक नाटकांतून अभिनयाचे सादरीकरण अमरचंद ठवरे   बोंडगावदेवी मानसाने जीवनात एकतरी लहान-मोठा धंद जोपासला पाहीजे असे म्हणतात. सार्वजनिक जीवनात अनेक जण कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता अनेक प्रकारचे छंद जोपासत असतात. झाडीपट्टी रंगभूमीवर अशाच दोन मायलेकी ऐतिहासिक नाटकांमध्ये भूमिका करण्याचा छंद जोपासत असून त्यांची ही नाट्याभिनयाची हौस परिसरात कौतुकाची ठरत आहे. रंगभूमीवरुन ऐतिहासिक नाटकातील पात्रांना न्याय देण्याचा कसोसीने प्रयत्न लहान ताडगाव या खेडेगावातील तेजवंता माणिक नाकाडे व त्यांची १२ वर्षीय कन्या वैष्णवी अविरतपणे गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. आजघडीला महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना सर्वत्र दिसतात. असे एकही क्षेत्र नाही, ज्यामध्ये महिलांचा सहभाग नाही. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिला आपल्या लाजऱ्या स्वभावाने सार्वजनिक क्षेत्रात पुढे येण्यास धजावत नाहीत. मात्र अशाही वातावरणात तेजवंता व वैष्णवी या नायलेकींनी हा समज खोडून काढत ग्रामीण भागातील महिलाही आज कलेची जोपासणा करीत झाडीबोली रंगभूमीला समृद्ध करण्यास हातभार लावत असल्याचा प्रत्यय देत आहे. घरामध्ये सर्व सुख-सोयी उपलब्ध, सासरी राजकीय वातावरणाचा सहवास लाभलेला, मात्र घरात नाट्याबद्दलचे आकर्षण सर्वांना कायम असल्यामुळे तेजवंता नाकाडे यांना पती माणिक नाकाडे यांनी नाट्याभिनयाची आवड जोपासण्यासाठी कायम पाठबळ दिले. आज दोन्ही मायलेकी रंगभूमीवर ऐतिहासिक नाटकांमधून विविध भूमिकांना न्याय देऊन आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन करीत आहेत. आई-वडीलच्या घरापासूनच म्हणजे शालेय दशेपासून तेजवंता सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायच्या. परिसरातील पाटील लोकांना नाटकांचा आधीपासूनच छंद आहे. त्यामुळे घरामधील सांसारिक जबाबदारी सांभाळून या मायलेकी केवळ हौसेखातर नाटकांमधून अभिनय करण्याचा छंद जोपासत आहे. १२ वर्षाची वैष्णवी ही नाटकामध्ये भूमिका सादर करण्यासबरोबरच उत्तमपणे व्हायोलीनसुद्धा वाजविते. संगीताची आवड असल्याचे तिने आवर्जुन सांगितले. ऐतिहासीक नाटकामध्ये वैष्णवी बालकलाकाराच्या भूमिकेला साजेसा न्याय देते. तेजवंताबाई ऐतिहासीक नाटकातील पुरुषपात्रांना जीव ओतून न्याय देतात. म्हणूनच त्यांच्या अभिनयाला उत्स्फूर्त दाद मिळते. पती माणिक गोपाल नाकाडे यांच्या प्रोत्साहनामुळेचआपण रंगभूमीवरुन नाटकातील पात्रांना साजेसा न्याय देऊ शकले, अशी प्रतिक्रीया तेजवंता नाकाडे यांनी लोकमतजवळ व्यक्त केली. - नाटकांचे केंद्र ताडगाव ताडगाव हे गाव नाटकाचे केंद्र समजले जाते. गावामध्ये संपूर्ण स्त्री नट संचात नाट्यप्रयोग साकारल्या जातात. तेजवंता नाकाडे यांनी ऐतिहासिक नाटक संंगीत ‘सिंहाचा धावा’ यामध्ये दुर्योधनाची भूुमिका साकारली. तसेच ‘सैतानी पाश’ मध्ये कंस, ‘सोन्याची द्वारका’ या नाटकात कालीयवन, ‘स्वर्गावर स्वारी’ या नाट्यप्रयोगात हिरण्यकश्यपाच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील झरपडा, देवलगाव, तिडका, ताडगाव यासह गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या नाट्य प्रयोगात तेजवंता नाकाडे यांनी रंगभूमीवरुन पात्रांना न्याय देण्याचे काम केले. आपल्यातील एक हौशी कलाकारांची जाणीव नाट्यरसिकांना करुन देण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. आई तेजवंता व मुलगी वैष्णवी या दोघी मायलेकींचा हा छंद परिसरात चर्चेचा झाला आहे.