शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

देशी कट्ट्यासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST

(लोकमतचा दणका) गोंदिया : शहरात देशी कट्ट्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून, पोलिसांनी कारवाई करण्याची गरज असल्याचे खळबळजनक वृत्त ...

(लोकमतचा दणका)

गोंदिया : शहरात देशी कट्ट्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून, पोलिसांनी कारवाई करण्याची गरज असल्याचे खळबळजनक वृत्त ‘लोकमत’ने रविवारी (दि.२८) प्रकाशित केले. या वृत्ताची दखल पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घेऊन देशी कट्टा विक्री करणाऱ्या व बाळगणाऱ्यांविरोधात त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्ट्यासह दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘लोकमत’ने देशी कट्ट्यांच्या विक्रीसंदर्भात वृत्त प्रकाशित करताच पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अवैध धंदे, तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करीत आपल्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यासाठी रवाना केले. यात रविवारी (दि.२८) स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार भुवनलाल देशमुख, अर्जुन कावळे, पोलीस नायक कोडापे व विनोद गौतम हे पोलीस वाहनाने (क्रमांक एमएच ३५-डी ५६५) शहर ठाण्याच्या हद्दीत होळी बंदोबस्त, गुन्हेगार शोध व पेट्रोलिंग करीत होते. अशात त्यांना मपूर उपाध्याय विनापरवाना पिस्टल बाळगून असून, सध्या लालपहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने उभा आहे, अशी माहिती मिळाली. यावर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक आव्हाड यांना मााहिती देऊन ते निघाले व सापळा रचून मपूर ऊर्फ आऊ उमेश उपाध्याय (१९, रा. मुर्री लालपहाडी) याला ताब्यात घेतले.

पिस्टलसंदर्भात त्याला विचारणा केली असता त्याने मयूर प्रेमलाल गजभिये (रा.कुंभारेनगर) याला दिल्याचे व ती पिस्टल धम्मदीप गजभिये (रा. कुंभारेनगर) याच्या मालकीची असल्याचे सांगितले. यावरून त्याला ताब्यात घेऊन जात असताना रस्त्याने जाणारा मयूर प्रेमलाल गजभिये दिसला असता त्याला पकडून तपासणी केल्यावर त्याच्या कंबरेला पॅन्टमध्ये मागच्या बाजूला देशी पिस्तूल आढळली. ती पिस्टल ३५ हजार रुपये किमतीची आहे. या प्रकरणात मयूूर गजभिये व मपूर उपाध्याय लालपहाडी यांना अटक करण्यात आली आहे, तर आरोपी धम्मदीप गजभिये फरार झाला आहे. शहर पोलिसांत पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.