सी.पी. शाहू : ठाणेगाव येथे सिद्धार्थ विद्यालयाचे स्रेहसंमेलनकाचेवानी : कोणताही मुलगा जन्माला येतो, तेव्हा तो शून्य असतो. त्याला काहीही भान नसते. परंतु तो जसजसा मोठा होतो, त्यावेळी तेथील वातावरण, आई-वडील, पालक, परिसरातील जनसमुदाय, बहीण-भाऊ यांच्या माध्यमाने ते शिकतात व हुशार होतात, असे मत तिरोडा अदानी प्रकल्पाचे प्रमुख सी.पी. शाहू यांनी व्यक्त केले. तिरोडा तालुक्याच्या ठाणेगाव येथील सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे तीन दिवशीय स्रेहसंमेलन पार पडले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.उद्घाटन सी.पी. शाहू यांच्या हस्ते, तिरोड्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून अदानी फाऊंडेशनचे सुबोधसिंग, माजी आ. दिलीप बंसोड, जि.प. सदस्य प्रीती रामटेके, पं.स.चे माजी सभापती गजानन बारापात्रे, माजी पं.स. सदस्य शंकर बिंझाडे, संस्थाध्यक्ष आर.जी. बागडे, गयना बन्सोड, श्यामराव बन्सोड, शिवचरण बोरकर, उपसरपंच के.एस. पटले, सरपंच टी.डी. बागडे, तंमुसचे अध्यक्ष भरतलाल रहांगडाले, माजी सरपंच भाकचंद पटले, मलपुरीचे सरपंच लच्छू बिसेन, अरूण सुपारे, घनश्याम असाटी, शोभा चौरे, बाळा गभने, मनोहर खोब्रागडे उपस्थित होते. शाहू पुढे म्हणाले, मुलांनी जीवनात सभ्य वागणूक टिकवून ठेवावी. मनात दृध निश्चय केला तर शिक्षक, डॉक्टर, वैज्ञानिक, प्रधानमंत्री बनू शकतात. आज मुलांना मोबाईलचे कितीतरी भाग ओळखता येतात. मुलांनी आपल्या मनातील भीती काढून आत्मविश्वास वाढविण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी अदानी प्लाँटमध्ये येवून नवनवीन तंत्रज्ञान समजून घ्यावे. तंत्रशिक्षणाकडे कल असावा. भारतीय शिक्षण व विद्यार्थी उत्तम आहेत. विदेशातील सर्वोच्च संस्था नासासह विविध संस्थेत २५ टक्के आपले भारतीय वैज्ञानिक आहेत व उच्चपदी आहेत. आपणही तसे पद गाठू शकता, असे ते म्हणाले.आपल्या प्रास्ताविकातून प्राचार्य एल.डी. बागडे म्हणाले, सन १९८६-८७ मध्ये शाळेची स्थापना झाली. आता शाळेला २८ वर्षे पूर्ण झाली असून येथील अनेक विद्यार्थी उच्चपदी सेवारत आहेत, असे सांगितले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
जन्माने नव्हे, मार्गदर्शनातून मुलगा होतो हुशार
By admin | Updated: January 28, 2016 01:45 IST