शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

होम स्टे देणार पर्यटनाला बुस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:22 IST

जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. पर्यटन विकासाला चालना दिल्यास प्रशासनाला महसूल व स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याच दृष्टीकोनातून जिल्ह्यातील पर्यटन केंद्रालगत असलेल्या ५० गावात ‘होम स्टे’ संकल्पना राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५० गावांची निवड : रोजगार मिळण्यास होणार मदत

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. पर्यटन विकासाला चालना दिल्यास प्रशासनाला महसूल व स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याच दृष्टीकोनातून जिल्ह्यातील पर्यटन केंद्रालगत असलेल्या ५० गावात ‘होम स्टे’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. याकरिता काही गावांची निवड करण्यात आली आहे.जिल्ह्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, हाजरा फॉल, बोदलकसा, सुकडी डाकराम, कचारगड, प्रतापगड, नागराधाम, खरोबा पहाडी, मांडोदेवी यासारखी पर्यटन व तीर्थक्षेत्र स्थळे आहेत. नवेगावबांध राष्टÑीय उद्यान परिसरात निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. गोंदिया जिल्ह्यात तलावांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने हिवाळ्यात येथे विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे देश व विदेशातील पर्यटक देखील येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात येतात. बाहेरुन येणाºया पर्यटकांना ग्रामीण संस्कृती विषयी कुतुहल असते. यासर्व बाबींचा विचार करता पर्यटकांना ग्रामीण भागात राहण्याची दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन दिल्यास पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील ५० गावात ‘होम स्टे’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी निवड केलेल्या गावातील दोन कुटुबांना एक खोली आणि शौचालय बांधकामासाठी १ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच या होम स्टे स्थळांची माहिती महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाईल. यामुळे पर्यटकांना माहिती मिळण्यास मदत होईल.बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना थांबण्याच्या दृष्टीने दर्जेदार सुविधा मिळाल्यास पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यास मदत होईल.याकरिता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.सारस संवर्धनासाठी २७ तलाव राखीवगोंदिया जिल्ह्याची ओळख आता दुर्मिळ सारस पक्ष्यांचे संवर्धन करणारा जिल्हा म्हणून होवू लागली आहे. सेवा संस्था आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सारस संवर्धनासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. त्यामुळे सारस पक्ष्यांची संख्या वाढविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. सारस पक्ष्यांचे वास्तव्य आढळणारे जिल्ह्यातील २७ तलाव राखीव ठेवले जाणार आहे. यात सारस पक्ष्यांचे खाद्य आणि या परिसरात सेंद्रीय शेती करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.दुर्मिळ प्रजातीच्या रोपांची नर्सरीजिल्ह्यात वनसंपती मोठ्या प्रमाणात असून अनेक औषधोपयोगी वनस्पतींचा यात समावेश आहे. मात्र यांचे संवर्धन न केल्याने काही वनस्पती नष्ट होत आहे. यामुळे दुर्मिळ असलेल्या वनस्पती आणि झाडांच्या रोपांची नर्सरी लोहारा येथे तयार करण्यात येणार आहे.

टॅग्स :tourismपर्यटन