लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : शेतीमधून जास्तीत जास्त धानासह ईतर पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावे, यासाठी रासायनिक खतासह कीटकनाशक औषधांची वारेमाप मात्रा दिली जाते. रासायनिक साधनांमुळे उत्पादनात वाढ होत असली तरी शेतजमिनीची सुपिकता कमी होते. जमिनीचा पोत निकृष्ठ होवून उत्पादन शक्ती कमी होते. वारंवार एकच धानाचे पीक घेतल्याने उत्पादनावर विपरित परिणाम होते. त्यामुळे शेतकºयांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. सेंद्रिय शेती आरोग्यासह शेतकºयांसाठी वरदान आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले.तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगावच्या वतीने जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण व सेंद्रिय भात प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम शिव रेडिडेन्सी बरडटोली येथील सभागृहात घेण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले, हल्लीच्या विषयुक्त पीक उत्पादनामुळे आरोग्यावर परिणाम होतो. परंपरागत पीक पद्धतीला बगल देवून कृषी विभागाच्या सल्याने तंत्रज्ञानाावर आधारित शेती करण्याची मानसिकता शेतकºयांनी तयार करणे गरजेचे आहे. आरोग्याला पोषक असे शेती उत्पादन करण्यासाठी सेंद्रिय शेती करणे आज काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.उद्घाटन पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, प्रगतीशील शेतकरी रतिराम राणे, मंडळ कृषी अधिकारी नंदकुमार मुनेश्वर, संजय रामटेके, कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, पी.बी. ठाकूर उपस्थित होते.सर्वप्रथम कृषी महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व माल्यार्पण करुन सेंद्रिय भात प्रचार कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सेंद्रिय भात प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम तसेच सेंद्रिय भात चव उपक्रमाला तालुकास्तरीय सर्वच शासकीय यंत्रणा व तालुक्यातील शेतकºयांना निमंत्रित करण्यात आले होते.याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम म्हणाले, आजघडीला रासायनिक खते तसेच कीटकनाशक औषधींचा शेती उत्पादनात वारेमाप उपयोग होत आहे.शेतामधील जमिनीचे मित्र असलेले गांढुळ, सजीव सृष्टी, जमिनीच्या आत असलेले असंख्य जिवाणू मृत्युमुखी पडतात. त्यामुळे जमिनीला पोषक वातावरण मिळत नाही. त्यामुळे पर्यायाने जमिनीची सुपिकता लोप पावत असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकरी हा अन्नदाता आहे. अन्नदात्याने विषयुक्त शेतमाल जनतेला उपलब्ध करुन देऊ नये. शरीराला पोषक असे सात्विक उत्पादन जनतेला देण्यासाठी शेतकºयांनी सेंद्रिय शेतीची कास धरल्याशिवाय गत्यंतर नाही, असे तालुका कृषी अधिकाºयांनी सांगितले. तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी रतिराम राणे, राजेंद्र ठाकरे, वासुदेव उके यांनी सेंद्रिय शेतीबद्दलचे विचार व्यक्त केले.संचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी केले. आभार कृषी पर्यवेक्षक ऋषी चांदेवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी घनशाम चचाणे, भारती येरणे, चिंतामन मसराम, कोवासे, अविनाश हुकरे, बोरकर, मेश्राम आदिंनी सहकार्य केले.काळानुरुप बदल आवश्यकआज पाण्याचे दुर्भिक्ष्य सातत्याने जाणवत आहे. पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. याचे भान ठेवून पाण्याची बचत करणे काळाची गरज आहे. वंश परंपरागत धानाची शेती करणे आजच्या परिस्थितीत परवडणारी नाही. निसर्गाचा लहरीपणा पाहता काळानुरुप शेतकºयांनी पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. धानाशिवाय कमी खर्चाचे कडधान्य, भाजीपाला यासारखे पीक सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून घ्यावे. राष्टÑीय कार्यक्रमाला हातभार लावण्यासाठी शेतकºयांनी पुढे यावे, असे आवाहन पं.स. सभापती अरविंद शिवणकर यांनी केले.सेंद्रिय शेतीमुळे शेतकºयांचा विकासउत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकरी रासायनिक खताची मात्रा मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे जमिनीची सुपिकता आपोआपच कमी होते. कीटकनाशक औषधी व्यतिरिक्त दशपर्णी अर्क, लिंबोळी, पालापाचोळा, शेणखताचा वापर करुन सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकºयांनी पुढे यावे. सेंद्रिय शेतीपासून उत्पादित शेतमालाला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे निश्चितच शेतकºयांचा आर्थिक लाभ होण्यास विलंब लागणार नाही.सेंद्रिय भाताची चवयाप्रसंगी उपस्थित अधिकारी तसेच शेतकºयांना सेंद्रिय भाताच्या चवीची गुणवत्ता समाजावी म्हणून आयोजकांकडून सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भात उपस्थितांना अल्पोहार म्हणून देण्यात आला. भाताची चव घेतल्यानंतर अनेकांनी सेंद्रिय तांदळाची मागणी सदर नोंदविली.
सेंद्रिय शेती आरोग्यासह शेतकºयांसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:29 IST
शेतीमधून जास्तीत जास्त धानासह ईतर पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावे, यासाठी रासायनिक खतासह कीटकनाशक औषधांची वारेमाप मात्रा दिली जाते.
सेंद्रिय शेती आरोग्यासह शेतकºयांसाठी वरदान
ठळक मुद्देतुमडाम : पीक पद्धतीमध्ये बदलाची गरज, विषयुक्त उत्पादनामुळे आरोग्यावर परिणाम