शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

वाढणाऱ्या रुग्णसंख्येने बोगस डॉक्टरांची चांदी

By admin | Updated: September 11, 2014 23:38 IST

सध्याचा हवामानात आर्द्रता आणि उष्णतेत वाढ होऊन सर्वत्र पावसाच्या पाण्याने दलदल निर्माण झाली आहे. डांसाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशातच रोगांनी थैमान घातले असून परिसरात शासकीय

रावणवाडी : सध्याचा हवामानात आर्द्रता आणि उष्णतेत वाढ होऊन सर्वत्र पावसाच्या पाण्याने दलदल निर्माण झाली आहे. डांसाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशातच रोगांनी थैमान घातले असून परिसरात शासकीय आरोग्य सुविधा हवी तसी उपलब्ध नसल्यामुळे बोगस डॉक्टरांची चांदी आहे. रावणवाडी तालुक्यातील महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या आरोग्य केंद्रात योग्य सुविधा होत नसल्यामुळे अखेर आजारी रुग्णांना बोगस डॉक्टरंच्या संपर्कात जावून उपचार करून घ्यावे लागत आहे. या आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी पुरेशा सोयी-सुविधा व आवश्यक औषधाचा साठा उपलब्ध नाही. मुख्यालयात नियमित हजर नसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाणवामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. येथे मुख्यालयी राहण्याऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती व्हावी यासाठी येथील नागरिकांनी वारंवार आरोग्य प्रशासनाकडे मागणी केली. मात्र आरोग्य विभागाने कसलीच उपाययोजना केली नाही. लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष आहे. केवळ मतांसाठी राजकारण करून संधी साधण्याचे काम ते करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.सदर गावात आवश्यक असणारी शासकीय आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध होत नाही. याचाच फायदा बोगस डॉक्टर सध्या घेताना दिसत आहेत. सद्यस्थितीत शासकीय आरोग्य केंद्रावर बऱ्याच बाबींचा तुटवडा आहे. येथील खासगी स्वरूपाचेदेखील दर्जेदार रूग्णालय नाही. त्यामुळे बोगस डॉक्टर संधीचे सोने करीत आहेत. प्रशिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्याकडून नागरिकांच्या आरोग्याचे खेळ मांडले जात आहे. परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. मात्र या डॉक्टरांना औषधाचा साठा कोण उपलब्ध करून देत आहे? त्याचा शोध घेणेही तेवढेच गरजेचे झाले आहे. या भागात आरोग्याबद्दल अनेक समस्या आहेत. मात्र सबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. परिसरातील गोरगरीब रुग्णांना शहरात जावून उपचार करून घेणे कठिण होते. हे गाव ग्रामीण परिसरातील मुख्य गाव असल्यामुळे दरदिवशी शेकडो रुग्ण उपचारासाठी येथील खासगी दवाखान्यांचा आधार घेत आहेत. मात्र या खासगी दवाखान्याचे डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांचे साटेलोटे असल्यामुळे उपचार कमी आणि आर्थिक भुर्दंडच अधिक बसतो. प्रयोगात्मक उपचार करून रुग्णांच्या माथी महागडी औषधे लिहून दिली जातात व रुग्णांची लुबाडणूक केली जाते. या प्रकाराची जाणीव आरोग्य विभागाला असूनही यावर आळा घालण्यासाठी कुणीही लक्ष देत नाही. (वार्ताहर)