शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तक जीवन जगण्याचा मार्ग सांगते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:10 IST

मुलांनो उच्च स्वप्न बघा. उंच भरारी घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तुमच्याजवळ दोन आणे असतील तर एक आण्याची भाकर घ्या व एक आण्याचे पुस्तक घ्या असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.

ठळक मुद्देई.झेड. खोब्रागडे : आॅफीसर्स फोरमने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुलांनो उच्च स्वप्न बघा. उंच भरारी घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तुमच्याजवळ दोन आणे असतील तर एक आण्याची भाकर घ्या व एक आण्याचे पुस्तक घ्या असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. कारण, भाकर तुमच्या शरीराचे पोषण करते तर पुस्तक जीवन जगण्याचा मार्ग सांगते, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी केले.महाराष्ट्र आॅफीसर्स फोरम गोंदिया शाखेच्यावतीने १० वी व १२ वीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या अनु.जाती-जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर चंद्रीकापुरे, सेवानिवृत्त कृषी अधिक्षक विकास सुटे, शिवदास वासे, कमल बोम्बार्डे, उपअभियंता (सिंचन) एस.पी.शहारे, सहा. जि. नियोजन अधिकारी संदीप भिमटे, मधु बंसोड उपस्थित होते. कार्यक्रमात संतकबीर ज्यु. कॉलेज सिवनी, मनोहर म्युनिसिपल गोंदिया, पंचशील हायस्कूल मक्काटोला, राजस्थानी कन्या, बीएजे हायस्कूल, सुकन्या संकल्प काटी, लालचंद ज्यु. कॉलेज दासगाव, अनुसया पशीने ज्यु. कॉलेज दासगाव, शारदा ज्यु. कॉलेज रतनारा, फुलचूर हायस्कूल, श्रीराम हायस्कूल खमारी, महावीर मारवाडी हाय., संस्कार हायस्कूल गोंदिया इ. शाळांतील विद्यार्थ्यानी भाग घेतला होता. त्यांचा ‘वास्तव’ नावाचे पुस्तक, एक गुलाबपुष्प, स्मृतिचिन्ह व एक मिठाईचे पॅकेट देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्तावीक जिल्हाध्यक्ष डॉ. माधवराव कोटांगले यांनी मांडले. संचालन डॉ. सी.टेंभूर्णे यांनी केले. आभार उपाध्यक्ष राजरतन कुंभारे यांनी मानले.कार्यक्रमासाठी चंद्रगुप्त अंबादे, आशा रामटेके, सुनिल पटले, डोंगरवार, रमेश तनवानी, एच.जी.मेश्राम, इंद्रपाल बागडे, सुरेंद्र राऊत, सिमा गणवीर, धाबर्डे, चंदु बडवाईक, संथागारचे संचालक रोशन मडामे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.