शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या मुजाेरीने अडकला तेंदूपत्ता मजुरांचा बोनस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST

जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना बोनस स्वरुपात काही रक्कम दिली जात; पण सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा, आबकारीटोला, कोयलारी, पुतळी पांढरवाणी, सालईटोला, कन्हारपायली, उशिराखेडा, मोहघाटा, आतकारीटोला येथील मंजुरांना मागील तीन वर्षांपासून बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे मजुरांनी माजी जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्याकडे तक्रार केली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  वन विभागाकडून तेंदूपत्ता हंगामातील मजुरांच्या बोनसची रक्कम मजुरांच्या खात्यात जमा करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी वळती करण्यात आली. मात्र बऱ्याच मजुरांचे खाते क्रमांक न जुळल्याने ४८ लाख रुपयांचा निधी परत आला. मात्र कोणते खाते क्रमांक जुळले नाही, याची माहिती देण्यास स्टेट बँकेकडून मागील दोन वर्षांपासून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे मजुरांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना बोनस स्वरुपात काही रक्कम दिली जात; पण सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा, आबकारीटोला, कोयलारी, पुतळी पांढरवाणी, सालईटोला, कन्हारपायली, उशिराखेडा, मोहघाटा, आतकारीटोला येथील मंजुरांना मागील तीन वर्षांपासून बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे मजुरांनी माजी जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी या तक्रारीची दखल घेत खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून वनविभागाकडे पाठपुरावा केला. वन विभागाला खा. प्रफुल्ल पटेल यांचे पत्र मिळताच त्यांनी वेगाने प्रक्रियेला सुरुवात केली. त्यानंतर विभागाने खा. पटेल यांना पत्राच्या पाठविलेल्या उत्तरात वन विभागाने तेंदूपत्ता मजुरांच्या बोनससाठी २०१९ मध्ये ४ कोटी रुपयांचा निधी स्टेट बँकेच्या शाखेकडे मजुरांच्या खात्यावर जमा करण्यासाठी वळता केला. मात्र स्टेट बँकेने यापैकी ४८ लाख रुपयांचा निधी मजुरांचे आधारकार्ड आणि खाते क्रमांक जुळत नसल्याचे सांगत परत केला. यानंतर वन विभागाने कुठल्या मजुरांचे खाते क्रमांक जुळत नाही, यासाठी बँकेकडून स्टेटमेंट मागविले; मात्र मागील दोन वर्षांपासून स्टेट बँकेने ते दिले नाही. त्यामुळे ७०० मजुरांना त्यांच्या हक्काचा बोनस मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. 

जिल्हाधिकारी बोलविणार बैठक nमजुरांच्या बोनसचा प्रश्न माजी जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तराेणे यांनी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची सोमवारी भेट घेऊन मांडला. यावर त्यांनी दोन-तीन दिवसांत यावर स्टेट बँकेचे व्यवस्थापक आणि उपवनसंरक्षक यांची संयुक्त बैठक घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी आनंदराव इळपाते, गेंदलाल खंडाते, सूरज पंधरे, शामलाल उईके, भरतराम मरस्कोल्हे, जगदीश पंधरे, प्रकाश कुंभरे, रामदास चिचाम, काशिराम आमले, नीलकंठ उईके, शालीकराम आमले, सुरलाल वाढीवे उपस्थित होते.

बँक म्हणते स्टेटमेंट देण्यासाठी वेळ नाहीnवन विभागाच्या लेखा विभागाचा एक कर्मचारी मागील दोन वर्षांपासून गोंदिया येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत स्टेटमेंट मिळावे म्हणून हेलपाटे मारत आहे. मात्र बँक व्यवस्थापनाने प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळीचे धोरण कायम ठेवले आहे. त्यामुळे मजुरांना त्यांचा हक्काचा दाम मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. 

 

टॅग्स :forest departmentवनविभागbankबँक