शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा बिनधास्त उपचार

By admin | Updated: March 10, 2016 02:29 IST

शासनाने पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत स्त्री भ्रृणहत्येवर आळा घालण्यासाठी कडक कायद्याची निर्मीती केली.

पाच वर्षात एकही कारवाई नाही : सडक-अर्जुनी, गोरेगाव व अर्जुनी-मोरगाव संवेदनशीलनरेश रहिले गोंदियाशासनाने पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत स्त्री भ्रृणहत्येवर आळा घालण्यासाठी कडक कायद्याची निर्मीती केली. ज्यांना गर्भपात करण्याची खरच गरज असेल त्यांच्यासाठी जिल्ह्यात ३० परवानगी असलेले केंद्र दिले. परंतु अनैतिक संबधातून गर्भधारणा झालेले किंवा ज्यांनी मुलगी असेल असे माहिती झाल्यास ते परवानाप्राप्त केंद्रात न जाता भोंदू व बोगस डॉक्टरांचा आधार घेतात. गोंदिया जिल्ह्यात आठ वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांना पकडण्यात आले. परंतु मागील पाच वर्षापासून गोंदिया जिल्ह्यात एकही बोगस डॉक्टरला पकडण्यात आले नाही. त्यामुळे बोगस डॉक्टरांना अभय आहे. ते स्त्री भृ्रणहत्या करीत असावे हे नाकारताही येत नाही. बोगस डॉक्टरांच्या माध्यमातून गर्भपात करविला जातो. परंतु बोगस डॉक्टरांविरूध्द कारवाई करणारी यंत्रणा बैठका नाही, नियोजन नाही व कारवाईसाठी पुढे पाऊल टाकत नसल्याने मुलींची भ्रृणहत्या होत असल्याचे लक्षात येते. गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी, गोरेगाव व अर्जुनी-मोरगाव हे तिन तालुके मुलींना पुरूषाच्या बरोबरीने जन्म घालण्यात खूपच कमी आहेत. त्यात सडक अर्जुनी तालुक्यात आहे. ४३९ मुलांमागे ३३५ मुलींंनी जन्म घेतला. येथे हजारी पुरूषांमागे मुलींचा जन्मदर ७६३ आहे. एका हजारावर २३७ मुलींचे प्रमाण कमी आहे. गोरेगाव तालुक्यात ३८९ मुलांमागे ३४१ मुलींनी जन्म घेतला. येथे हजारी पुरूषांमागे मुलींचा जन्मदर ८७७ आहे. एका हजारावर १२३ मुलींचे प्रमाण कमी आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यात ५३६ मुलांमागे ४७५ मुलींनी जन्म घेतला. या तालुक्यात हजारी पुरूषांमागे ८८६ मुलींची संख्या आहे. एका हजारावर ११४ मुलींचे प्रमाण कमी आहे. या आकडेवारीवरून गोंदिया जिल्ह्यात स्त्री भ्रृणहत्या होत आहे हे लक्षात येते. मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये गर्भपातासाठी स्थलांतरण?महाराष्ट्रात सोनोग्राफी केंद्राना गर्भपात करू नये असे कडक निर्देश दिलेत. त्यासाठी डॉक्टरांच्या विरूध्द कडक शिक्षेची तरतून असलेला कायदा अंमलात आणला. गोंदिया जिल्ह्याला लागून मध्यप्रदेश व छत्तीसगड आहे. या राज्यात जाऊन गर्भपात केल्या जात असल्याची माहिती आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुके मुलींना पुरूषाच्या बरोबरीने जन्म घालण्यास अपयशी ठरले आहेत. बोगस डॉक्टरांना पकडण्यासाठी अशी असते समितीबोगस डॉक्टरांना पकडण्यासाठी शासनाने शासनाने ७ फेब्रुवारी २००० रोजी एक शासननिर्णय काढून त्यासाठी एक समिती गठित करण्याचे सूचविण्यात आले. त्या नुसार जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष तर पोलीस उपअधिक्षक मुख्यालय हे सदस्य सचिव म्हणून ठेवण्यात आले. सदस्य म्हणून पोलीस अधिक्षक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा सल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन अश्या आठ जणांचा समावेश असतो. परंतु गोंदिया जिल्ह्यात मागील अनेक दिवसापासून या समितीची बैठकच झाली नाही असे कळते. सहा वर्षात ५२ हजार ७३८ कुटुंबनियोजन शस्त्रक्रियालोकसंख्येवर आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात मागील सहा वर्षात ५२ हजार ७३८ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सन २०१०-११ या वर्षात ९०७९ शस्त्रक्रिया झाल्या. सन २०११-१२ या वर्षात ९१६७ शस्त्रक्रिया झाल्या. सन २०१२-१३ या वर्षात ९१६७ शस्त्रक्रिया झाल्या. सन २०१३-१४ या वर्षात ८८३१ शस्त्रक्रिया झाल्या. सन २०१४-१५ या वर्षात ८७०० शस्त्रक्रिया झाल्या. सन २०१५-१६ या वर्षात ७७ शस्त्रक्रिया झाल्या. सन २०१५-१६ या वर्षात ७७९४ शस्त्रक्रिया झाल्या. बुधवारी प्रकाशित झालेल्या बातमीतील कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतर ५३० महिलांना गर्भधारणा झाली नसून गर्भपात केल्यानंतर त्या महिलांचे कुटुंबनियोजन करण्यात आले. गर्भनिरोधक साहित्याचा वापर करूनही ३०८० महिला गर्भवती झाल्याचा प्रकार पुढे आला. यात साहित्याचा वापर करणाऱ्या लोकांचीही चूक पुढे येत आहे.