शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

रसाळ फळे ठरताहेत वरदान

By admin | Updated: April 8, 2017 00:57 IST

उन्हाळ्याचे दिवस सर्वात जास्त त्रासदायक असतात. या ऋतुमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार

आरोग्याची काळजी : डॉक्टरांचे फळांच्या सेवनाचे आवाहन, दिल्या आरोग्याच्या टिप्स सालेकसा : उन्हाळ्याचे दिवस सर्वात जास्त त्रासदायक असतात. या ऋतुमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार व विहारावर विशेष लक्ष तसेच दिनचर्या ठेवणे आवश्यक असते. अशातच उन्हाळ्यात जर रसाळ फळांचे सेवन करीत असल्यास उत्तम आरोग्य टिकवून ठेवण्यात मोठी मदत मिळत असते. यामुळेच उन्हाळ््यात रसाळ फळे आरोग्यासाठी वरदान ठरतात. ग्रिष्मऋतुमध्ये घाम फुटत असल्याने सतत शरीरातून पाणी बाहेर निघत असते. त्याबरोबर अशक्ततपणा, थकवा वाटणे इत्यादी प्रक्रिया सतत घडत असतात. अशात पाण्याचे भरपूर सेवन तसेच फळांचा रस, निंबू पानी, शरबत, पन्हे इत्यादी शरीराला देत राहिल्यास शरीरात स्फुर्ती व ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत मिळते. प्रकृती मनुष्याची सर्वात मोठी काळजी वाहक असून कोणकोणत्या ऋतुमध्ये कोणकोणती फळे उपयोगी असतात याला अनुसरुन फळे उपलब्ध होतात. म्हणून ऋतुफळे जास्त सेवन करायला हवे. उन्हाळ्यात द्राक्ष, टरबूज, खरबूज, आंबा, अननस, डाळींब, निंबू इत्यादी फळे शरीराला मोठे वरदान असून या फळांचा रस नियमीत पिल्यास उन्हाळ्यात सुद्धा आरोग्य ठणठणीत ठेवण्यात मदत मिळते. भोजनात सुद्धा रसाळ भाजी प्रकार किंवा पालेभाज्या सेवन केल्यास पचायला हलक्या व आरोग्यवर्धक असतात. टमाटर मध्ये द्रव्य रुप जास्त असून विविध स्वरुपात टमाटरचे नित्यसेवन फार उपयोगी असते. त्याच बरोबर काकडी, दूधी भोपळा, दोडके इत्यादी भाजी प्रकार हलके व पाचक असतात. प्रकृती आणि ऋतुचा नेहमी घट्ट संबंध असतो. आरोग्य टिकवून ठेवण्यास हे समजून घेणे आवश्यक असते. शरीराची पाचनसंस्था जठराग्नी बाहेरच्या थंडी आणि गरमीला अनुसरुन स्वत:त बदल करीत असते. (तालुका प्रतिनिधी) ऋतुुनुसार अशी असते पचनसंस्था ठंडीच्या दिवसात बाहेरचे वातावरण खूप गार असते. शरीराची पाचनसंस्था उष्ण असते. अशात उष्ण जढराग्नी कोणतेही भोजन पचवून घेण्यात सक्षम असते. त्यामुळे जड पदार्थ सुद्धा पचन्यास मदत मिळते. म्हणून शरीराच्या आतील भाग उष्ण ठेवण्यासाठी ठंडीच्या दिवसात उष्ण पदार्थावर गरम पेय पदार्थ प्राशन करने हितकारक असते. म्हणूनच ठंडीच्या दिवसात चिकन, मटन, अंडीसोबत गरम सूप, कॉफी, चहा खूप उपयोगी ठरतात. उन्हाळ्यात शरीराची प्रकृती विपरित झालेली असते. रनरनत्या उन्हात जड व उष्ण आहारांचे सेवन करने आरोग्यासाठी धोकादायक असून या मोसमात रसाळ ऋतृू फळे त्याचबरोबर ठंड पेय जास्त उपयोगी ठरते. बाहेर उन्हाळा वाढल्यास शरीराच्या आत पाचनसंस्था ठंड व कमजोर झालेली असते. अशात जड वस्तू किंवा तळलेले पदार्थ व उष्ण पदार्थ पचवण्यास कठिण जाते. त्यामुळे मलमुत्र योग्यप्रकारे उत्सर्जीत होत नाही व आरोग्यावर वाईट परिणाम घडण्याची दाट शक्यता असते. अशात भरपूर रस व पाणी असलेल्या फळांचे सेवन उत्तम व आरोग्यदायक असते.