शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाच्या कामावर बोगस मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 21:53 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील मुरपार राम येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत गट क्र. ३७४ मध्ये तलाव खोलीकरणाचे काम ग्रा.पं. कार्यालयांतर्गत करण्यात येत आहे. मात्र या कामावर बोगस मजूर दाखविल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांची तक्रार : चौकशीची मागणी, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील मुरपार राम येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत गट क्र. ३७४ मध्ये तलाव खोलीकरणाचे काम ग्रा.पं. कार्यालयांतर्गत करण्यात येत आहे. मात्र या कामावर बोगस मजूर दाखविल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तसेच याची खंडविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.मनरेगाच्या कामावर गावातील पंधरा मजूर कामावर न नसताना सुध्दा येथील रोजगार सेवकाने त्यांची हजेरी लावल्याची चाहूल गावकºयांना लागली. यानंतर त्यांनी १ मार्चला पंचायत समिती सडक अर्जुनी येथील खंडविकास अधिखकारी व २ मार्चला उपजिल्हाधिकारी गोंदिया यांना तक्रार केली. त्यानंतर १४ मार्चला पं.स. सडक अर्जुनी येथील विस्तार अधिकारी एम.एस.खुने यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चौकशीला सुरुवात केली. त्या चौकशी दरम्यान धनलाल शिवलाल चौधरी (६८) हा व्यक्ती गवंडी कामावर जातो. मात्र त्या व्यक्तीचे नाव तलाव खोलीकरणाच्या हजेरी पत्रकावर नाव लिहिलेले आहे. तो व्यक्ती श्रावणबाळ योजनेचा लाभार्थी असून दर महिन्याला मानधनाची उचल करतो. दुसरे नाव रोजगार सेवकाच्या पत्नीचे असून एकही दिवस कामावर न येता हजेरी पटावर नाव लिहिले आहे.त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये यावरुन चांगलाच गदारोळ झाला. जो मजूर कामावर जात असून त्याची रोजंदारी कमी व घरी राहणाºया व्यक्तीची काम न करता मोबदला जास्त असा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे गावकºयांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असता एम.एस.खुणे यांनी मध्येच चौकशी थांबविल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. मुरमार राम येथील तलाव खोलीकरणाची चौकशी करण्याची मागणी उपेंद्र बोपचे, उपसरपंच सुदेश फुल्लूके, रविंद्र पटले, भिमराव पटले, चौकलाल चौधरी, ध्रुवराज बोपचे, कैलास बोपचे, सेवकराम पटले, दिनेश चौधरी यांनी केली आहे.