शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

By admin | Updated: May 15, 2014 23:43 IST

परिसरात बोगस डॉक्टरांचा व्यवसाय मोठय़ा जोमाने फोफावला आहे. अशा बोगस डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांचा थांगपत्ता लावून कारवाई का म्हणून करण्यात येत नाही,

रावणवाडी : परिसरात बोगस डॉक्टरांचा व्यवसाय मोठय़ा जोमाने फोफावला आहे. अशा बोगस डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांचा थांगपत्ता लावून कारवाई का म्हणून करण्यात येत नाही, अशा प्रश्न परिसरातील सुज्ज्ञ नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

अन्न व औषधी व्यवसाय बर्‍याच अंशी नियंत्रणात आणि कायद्यांतर्गत सुरू असल्याचा दावा अन्न व औषध प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून करण्यात येत आहे. तरी बोगस डॉक्टरांना औषधांचा पुरवठा कोणत्या स्त्रोतांद्वारे होत असते हा संशोधणाचा विषय ठरला आहे. नुकतेच अन्न व औषध प्रशासन विभागाने निर्धारित केलेल्या काही औषधी सक्षम डॉक्टरांचा चिठ्ठीविना विक्रेत्यांनी विकू नये, अशा विक्रीवर विभागाने लक्ष वेधून टाकले. तरी बोगस डॉक्टरांना औषधांचा पुरवठा कोठून व कोणत्या विक्रेत्यांकडून उपलब्ध होतो असा प्रश्न उपस्थित होतो. अशा औषध विक्रेत्यांचा शोध अन्न व औषध विभाग लक्ष देवून लावणार त्या दिवसापासूनच ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट काही प्रमाणात अंकुश लावता येणार असल्याचे मत जानकार नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या ग्रामीण परिसरात विना वैद्यकीय परवाना असंख्य बोगस डॉक्टरांची भरमार आहे. त्यात काही डॉक्टर औषधांच्या दुकानात रोजंदारीवर विक्रेत्यांना मदत करणारे किंवा एखाद्या डॉक्टरच्या रुग्णालयात काम करणारेच आज डॉक्टर होऊन बिनधास्त व्यवसाय करीत असून अशा डॉक्टरांनी हा पूर्ण परिसर गजबजलेला आहे. मात्र अशा बोगस डॉक्टरांवर कारवाईची टक्केवारी फारच कमी आहे. काही बोगस डॉक्टर रुग्णांवर औषधोपचारासाठी लागणारी पूर्ण सामग्री घेवून गावात फिरुन रुग्णांवर औषधोपचार करीत आहेत. तर काही डॉक्टर्स आपले दवाखाने खोलून रुग्णांना लुबाडण्याचे कृत करीत असल्याचा प्रकार ग्रामीण भागात जोमाने फोफावला आहे.

संबंधित विभागाला बोगस डॉक्टरांची आजतागायत माहिती नाही. ते तर या भागातील नागरिकांचे दुदैवच म्हणावे लागणार. यात तिळ मात्र शंका उद्भवत नाही. औषध विक्रेते बोगस बिल ग्राहकांचा माथी मारुन शासनाला विक्री कराच्या माध्यमातून प्राप्त होणारी महसुलाची वाट लावीत आहेत. बोगस डॉक्टरांना विक्रेत्यांकडून औषधे पूरविणे कायमचे बंद करण्यात आले तरच बोगस डॉक्टरांच्या व्यवसायावर अंकुश लावता येऊ शकणार असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.