शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

‘बोगस आदिवासी विरुद्ध न्यायालयीन लढा’ चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:32 IST

आदिवासी वसतिगृह माजी विद्यार्थी ग्रुपच्यावतीने ८ सप्टेंबर रोजी येथील बचत भवनात ‘बोगस आदिवासी विरुद्ध न्यायालयीन लढा आफ्रोटची भूमिका’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी बँक आॅफ महाराष्ट्र लाखणी शाखेचे व्यवस्थापक कुंदन वल्के होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : आदिवासी वसतिगृह माजी विद्यार्थी ग्रुपच्यावतीने ८ सप्टेंबर रोजी येथील बचत भवनात ‘बोगस आदिवासी विरुद्ध न्यायालयीन लढा आफ्रोटची भूमिका’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी बँक आॅफ महाराष्ट्र लाखणी शाखेचे व्यवस्थापक कुंदन वल्के होते.प्रमुख पाहुणे म्हणून आफ्रोटचे अध्यक्ष राजेंद्र मरस्कोल्हे, सुरेश पेंदाम, प्राचार्य राजकुमार हिवारे, पो.नि. शिवराम कुंभरे, प्रा. डॉ. देवकुमार राऊत, प्रा. दिलीप धुर्वे, मनोहर चर्जे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व प्रथम भगवान बिरसामुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राणी दुर्गावती यांचे प्रतिमांचे पूजन करुन दिप प्रज्वलन करुन चर्चा सत्राचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी उपस्थित आदिवासी मान्यवर वक्त्यांनी बोगस आदिवासी विरुद्ध सुरु असलेला न्यायालयीन लढा, १९७० ते २०१८ पर्यंतचा इतिहास तसेच आदिवासी समाजाच्या बाजूने लागलेले न्यायालयीन निवाडे व आफ्रोटची आतापर्यंतची व भविष्यातील बोगस आदिवासी संदर्भातील भुमिका या विषयी विस्तृत माहिती उपस्थित समाजबांधवांना दिली. संविधान बचाव व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट संदर्भातही माहिती देवून आदिवासी समाजाने संविधानाचा अभ्यास करुन तथा संघटित होवून अन्यायाविरोधात लढ्याचे व आदिवासी बहुल नक्षल प्रभावीत आदिवासी तरुण तरुणींनी शिक्षणाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून आदिवासी समाजात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आदिवासी वसतिगृह माजी विद्यार्थी ग्रुपतर्फे जमा करण्यात आलेला सामाजिक न्यायालयीन लढा निधी आफ्रोटला हस्तांतरीत करण्यात आला.कार्यशाळेला प्रकाश जमदाळ, जयपाल जमदाळ, सुरेश पेंदाम, ललीत कुंभरे, रवि कोकोडे, यशवंत कुंभरे, परमेश्वर उईके, मुरारी पंधरे, लक्ष्मीकांत मडावी, शिला उईके, रामेश्वर करचाल, लिलाधर ताराम, टिकाराम मारगाये, लक्ष्मण औरासे, लता उईके, वर्षा कुंभरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक मनोहर चर्जे यांनी मांडले.संचालन प्रा. सुनिता उईके यांनी केले. आभार मोहन नाईक यांनी मानले. कार्यक्रसाठी आॅल इंडिया आदिवासी फेडरेशन व बिरसा मुंडा सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.