शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 21:15 IST

शारदा विसर्जनासाठी गोंदिया येथील विठ्ठल रुख्मिणी तलावावर गेलेला तरुण तलावात बुडाला. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे२४ तास शोधमोहिम : कुटुंबीयांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शारदा विसर्जनासाठी गोंदिया येथील विठ्ठल रुख्मिणी तलावावर गेलेला तरुण तलावात बुडाला. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. तरुणाचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाºयांच्या मदतीने बुधवारी (दि.४) सायंकाळी ७ वाजेपर्यंत शोधमोहिम राबविण्यात आली. मात्र तरुणाचा शोध लागला नव्हता. दरम्यान गुरूवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तलावात एक मृतदेह तरंगताना काही नागरिकांना आढळला. याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता तो त्या तरुणाचा असल्याची खात्री पटली.अंकुश राजेश उके (१९) रा.संजयनगर, असे तलावात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. गोविंदपूर मार्गावरील एका सार्वजनिक शारदा उत्सव मंडळातर्फे स्थापन करण्यात आलेल्या शारदादेवीचे विसर्जन मंगळवारी रात्री छोटा गोंदिया परिसरातील विठ्ठल रुख्मिणी तलावात करण्यात आले.अंकुश सुध्दा त्याच्या मित्रांसह शारदा विसर्जनाकरिता या तलावावर गेला होता. दरम्यान अंकुश आणि त्याचा मित्र तलावात उतरले. मात्र काही वेळानंतर त्याचा मित्र बाहेर आला पण अंकुश बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्राने तलाव परिसरात त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेच आढळला नाही.मंगळवारी रात्री उशीरा ही घटना उघडकीस आल्याने रात्री तलावात शोध मोहीम राबविता आली नाही. दरम्यान बुधवारी सकाळी ७ वाजतापासून स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने तलावात नावेच्या मदतीने शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत तरुणाचा शोध लागला नव्हता. दरम्यान गुरूवारी (दि.५) सकाळी ७ वाजताच्या सुमारास फिरायला जाणाºया काही नागरिकांना तलावात मृतदेह तरंगाताना आढळला. याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी पोहचत तलावात मृतदेह बाहेर काढला. दरम्यान अंकुशच्या कुटुंबीयांना बोलावून तो मृतदेह अंकुशचाच असल्याची खात्री पटवून घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील श्वविच्छेदनगृहात पाठविला. दरम्यान नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती.तरुणाचा शोध घेण्यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी नगरसेवकांसह तलाव परिसरात पोहोचत मदत केली.कुटुंबीयांची दोन दिवसांपासून धडपडमंगळवारच्या रात्री अंकुश तलावात बुडाल्याची शंका व्यक्त केली जात होती. याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांची धडपड सुरू होती. बुधवारी दिवसभर तलावात शोध मोहीम राबविल्यानंतरही अंकुशचा शोध लागला नव्हता. त्यामुळे तो कुठेतरी निघून गेला असावा, तो परत येईल अशी आशा त्याच्या कुटुंबियांना होती. त्यांचे सर्व लक्ष अंकुशकडे लागले होते. अंकुश सुखरुप घरी परतेल अशी आशा त्याच्या कुटुंबीयांना होती. मात्र गुरूवारी (दि.५) त्याचा मृतदेह तलावात मिळाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना कळताच त्यांच्या दुख:ला पारा उरला नाही.कुटुंबात सर्वात लहान होता अंकुशअंकुश हा त्यांच्या कुटुंबात सर्वात लहान होता. त्याच्यापेक्षा एक मोठा भाऊ आणि तीन बहिणी आहेत. अंकुशचा एक भाऊ कामासाठी बाहेर राहतो. अंकुश गोंदिया रेल्वेस्थानकावर चहा विक्रीचे काम करायचा.