गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हड्डीटोली परिसरात रविवारच्या सकाळी ११ वाजता कुजलेल्या स्थितीत ४० ते ४५ वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळला.दहा दिवसापुर्वी ही घटना घडली असावी असा कयास लावला जात आहे. त्याचा अपघात, आत्महत्या की घातपात ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही. १० दिवसापूर्वी घटना घडली असावी असा कयास लावला जात आहे पण या दिवसात त्या मृतदेहावर कुणाचीच नजर गेली नाही. प्रताला दुर्गंधी सुटल्यावर ही बाब लक्षात आली. सदर घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
By admin | Updated: September 26, 2016 01:50 IST