शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरलाल दर्डा जयंतीनिमित्त गुरुवारी रक्तदान शिबिर

By admin | Updated: July 1, 2015 02:17 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी, राज्याचे माजी मंत्री आणि लोकमत समुहाचे संस्थापक स्व.जवाहरलाल दर्जा ...

लोकमत’चा उपक्रम : रक्तदान करून सामाजिक दायित्व निभवागोंदिया : स्वातंत्र्य संग्राम सेनानी, राज्याचे माजी मंत्री आणि लोकमत समुहाचे संस्थापक स्व.जवाहरलाल दर्जा यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी (दि.२) सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत गोंदिया पब्लिक शाळा, पांगोळी नदी रोड, गोंदिया येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूह व बाई गंगाबाई महिला रूग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला गंगाबाई रक्तपेढीच्या वतीने स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, कार्ड ेदेऊन अतिथींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात नेहमीच रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे गरजूंना रक्तासाठी मोठीच धावपळ करावी लागते. ही उणीव दूर करण्याचे उद्देश्य समोर ठेवून लोकमत समूह व बाई गंगाबाई रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. सदर शिबिरात रक्तदान करण्याचे आवाहन डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले आहे. सदर उपक्रमात लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्टच्या सदस्यांसह लोकमतचे वाचक, सामाजिक संघटना व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय (०७१८२-२३०५०७), (९८८१०११८२१), (९८२३१८२३६७), (९४२३६८९६६४) येथे संपर्क साधावा. (प्रतिनिधी)रक्तदान का करावे ?मानवी रक्ताला दुसरा कोणताही पर्याय नाही. ते कृत्रिमरीत्या बनविता येत नाही. रक्त अधिक काळ टिकवून ठेवता येत नाही.रक्तपेढीत रक्ताची सतत कमतरता असते. त्यामुळे रक्तदान नियमित करावे.तुमच्याद्वारे दिलेले रक्त कोणत्याही व्यक्तीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी, मातेच्या प्रसूतीच्या वेळी व दुखापतीमुळे अधिक रक्तस्त्राव झाल्याने रक्ताची कमतरता पूर्ण करून त्याचे जीव वाचवू शकते.रक्तावर ज्यांचे आयुष्य अवलंबून असते, असे सिकलसेल, थॅलेसॅमिया, हिमोफिलिया, अपॅल्स्टीक अ‍ॅनिमिया, रक्ताचे कर्करोग आदी रूग्णांना रक्तामुळे नवसंजीवनी मिळते.रक्ताची आवश्यकता कधी कोणाला आणि कोठे पडेल याची शाश्वती कुणी देऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ऐच्छिक रक्तदान होणे गरजेचे आहे. रक्तदान कोण करू शकतो?१८ ते ४८ वर्षे वयोगटातील व वजन ५० किलोपेक्षा अधिक असलेली कोणतीही निरोगी व्यक्ती स्त्री-पुरूष स्वेच्छेने रक्तदान करू शकतात. साधारणत: निरोगी युवकांनी दर तीन महिन्यातून एकदा रक्तदान केले तर रक्त निर्मितीला चांगली चालना मिळते.रक्तदान किती प्रमाणात?कोणत्याही शारीरिक हानीशिवाय एक व्यक्ती एका वेळी ३५० सीसी किंवा ४५० सीसी रक्तदान करू शकतो. दान केलेले रक्त आपले शरीर २४ तासात नैसर्गिकरित्या भरून काढते. रक्तदान सुरक्षित आहे का?होय, रक्तदान सुरक्षित, वेदनारहित व आनंदी असते. तसेच संपूर्णपणे सुरक्षित असते. रक्तदान केल्याने कोणताही त्रास होत नाही.रक्तदानासाठी किती वेळ लागतो?साधारणपणे रक्तदानाला १० ते १५ मिनिटे लागतात. यामध्ये रक्तदात्याचे वजन, हिमोग्लोबिन, रक्तदाब तपासणी आदी बाबींची वैद्यकीय तपासणी मोफत करण्यात येते. वास्तविक रक्तदानाची प्रक्रिया केवळ काही मिनिटातच पूर्ण होते.रक्तदान किती वेळा करता येते?एक व्यक्ती दर तीन महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतो. याचाच अर्थ म्हणजे आपण वर्षातून चार वेळा रक्तदान करू शकतो. रक्तदान कुठे केले जाऊ शकते?कुठल्याही मान्यताप्राप्त रक्तपेढीत, शासकीय रूग्णालयात किंवा रक्तदान समितीने आयोजित केलेल्या ऐच्छिक रक्तदान शिबिरात आपण रक्तदान करू शकतो.