शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बाबुजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर उद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 20:34 IST

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२) सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन्स परिसरातील सुभाष बागेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२) सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन्स परिसरातील सुभाष बागेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात जिल्ह्यातील नागरिकांनी स्वंयस्फूर्त रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन ‘लोकमत’ वृत्तपत्र समूह व डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटरच्यावतीने करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून आपण केलेल्या रक्तदानामुळे संकटाच्यावेळी अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होते.बरेचदा रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे रक्तदान करुन अशा गरजूंना मदत करण्याची ही संधी ‘लोकमत’ने उपलब्ध करुन दिली आहे. येथील शासकीय ब्लड बँकेत सुद्धा नेहमीच रक्ताची टंचाई असते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी पायपीट करावी लागते. ही अडचण लक्षात घेत ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबिरात लोकमत सखी मंच व युवा नेक्स्टच्या सदस्य तसेच ‘लोकमत’ वाचकांनी उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलींद वाढई, जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी बाल मंच जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) व सखी मंच जिल्हा संयोजिका ज्योत्स्ना सहारे (९४२१०६४७२२) यांच्याशी संपर्क साधता येईल.