शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाबुजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 21:57 IST

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२) सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन्स परिसरातील सुभाष बागेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२) सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन्स परिसरातील सुभाष बागेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात जिल्ह्यातील नागरिकांनी स्वंयस्फूर्त रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन ‘लोकमत’ वृत्तपत्र समूह व डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटरच्यावतीने करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून आपण केलेल्या रक्तदानामुळे संकटाच्यावेळी अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होते.बरेचदा रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे रक्तदान करुन अशा गरजूंना मदत करण्याची ही संधी ‘लोकमत’ने उपलब्ध करुन दिली आहे. येथील शासकीय ब्लड बँकेत सुद्धा नेहमीच रक्ताची टंचाई असते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी पायपीट करावी लागते. ही अडचण लक्षात घेत ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबिरात लोकमत सखी मंच व युवा नेक्स्टच्या सदस्य तसेच ‘लोकमत’ वाचकांनी उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलींद वाढई, जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी बाल मंच जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) व सखी मंच जिल्हा संयोजिका ज्योत्स्ना सहारे (९४२१०६४७२२) यांच्याशी संपर्क साधता येईल.