गोंदिया: लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवारतर्फे भव्य रक्तदान शिविराचे आयोजन लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलै रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत स्थानिक सुभाष गार्डन येथे आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी होवून रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) याच्याशी संपर्क साधावा.
रक्तदान शिबिर २ जुलै रोजी
By admin | Updated: June 29, 2017 01:20 IST