सडक-अर्जुनी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शिक्षकांनी मतदार यांद्याचे बीएलओ म्हणून काम केले. त्या संबंधित तालुक्यातील ११३ बीएलओ यांना त्वरित मानधन देण्यात यावे. तसेच ग्रामपंचायत निवडणूक २००९ मध्ये ज्यांनी केंद्राध्यक्ष तथा मतदान अधिकारी म्हणून काम केले, त्यांना त्वरित मानधन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक-अर्जुनीच्या वतीने गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंथेचे उपाध्यक्ष किशोर डोंगरवार यांच्या नेतृत्वात तहसीलदार एन.जे. उईके यांना निवेदन देण्यात आले.या वेळी शिक्षक समितीचे तालुका सरचिटणीस डी.आर. जिभकाटे, भास्कर नागपुरे, विरेंद्र वालोदे, एच.आर. चौधरी, सुभाष हरिणखेडे, बी.एम. गुरनुले, जे.बी.कऱ्हाडे, पी.सी. चचाने, एस.सी. खंडाते यांच्या उपस्थितीत सडक-अर्जुनीचे तहसीलदार एन.जे. उईके यांना निवेदन देण्यात येवून सदर मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. चर्चेत बीएलओ यांचे मानधन त्वरित बँकेत पाठविण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या मानधन मागणी संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार एन.जे. उईके यांनी समितीच्या शिष्टमंडळास दिले. ११३ शिक्षकांचे प्रत्येकी पाच हजार ०७५ रुपये त्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहेत. यासंबंधी बीएलओ यांच्या बँक खात्यांच्या काही अडचणी असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
बीएलओ यांना मानधन मिळणार
By admin | Updated: April 8, 2015 01:32 IST