शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रक्तस्त्रावाने बाळंतिणीचा मृत्यू

By admin | Updated: May 7, 2017 00:15 IST

गोरेगाव तालुक्याच्या कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या एका गर्भवती महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला.

डॉक्टरांचा हलगर्जीपणा?: प्रसूतीदरम्यान नाळ निघाला नाही लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या एका गर्भवती महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार (दि.५ ) रोजी दुपारी गोंदियाच्या आयुष क्रिटीकल हॉस्पीटलमध्ये घडली. अनिता सुखराम पटले (२३) रा. सोनेगाव ता. गोरेगाव असे मृत बाळंतिणीचे नाव आहे. गोरेगाव तालुक्याच्या कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सोनेगाव येथील अनिता पटले ही महिला गर्भवती असल्याने १८ एप्रिल रोजी तिच्या पोटात दुखू लागल्याने कन्हारटोली येथील डॉ. मेघा रत्नपारखी यांच्याकडे उपचार घेण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांनी या महिलेच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाला आहे, असे सांगितले. त्यानंतर ते घरी गेल्या. पुन्हा २६ एप्रिलला त्यांना उलट्या होऊ लागल्याने पुन्हा त्या डॉ. रत्नपारखी यांच्याकडे गेल्यावर त्यांनी त्यांना केएमजे हॉस्पीटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता केएमजे हॉस्पीटल येथे दाखल करून तिची सामान्य प्रसूती केली. परंतु तिच्या पोटातील प्लासंटा निघाला नाही. त्यामुळे थोड्या प्रमाणात चिरा लावल्याने तिला रक्तस्त्राव झाला. सतत सुरू असलेल्या रक्तस्त्रावामुळे प्रकृती नाजूक झाली. परिणामी तिला त्यामुळे तिला डॉक्टरांनी नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. अनिताला नागपूर येथील डॉ.बारोकर यांच्या आदित्य हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. ४ मे पर्यंत अनिताला तेथे उपचार देण्यात आला. परंतु प्रकृती नाजूक असल्याने तेथील डॉक्टरांनी घरी नेण्याचा सल्ला दिला. त्यावर ५ मे रोजी तिला घरी न नेता गोंदियाच्या आयुष क्रिटीकल या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दुपारी तिचा मृत्यू झाला. परंतु तेथील डॉक्टरांनी मृत घोषित न करता बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. गंगाबाई स्त्री रूग्णालयात आणल्यावर तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर गोरेगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नाकाडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना भेट दिली. अनिता संदर्भात डॉक्टरांचा असा सल्ला डॉ. मेघा रत्नपारखी यांनी बाळ पोटातच मृत असल्याचे सांगून केएमजे हॉस्पीटल मध्ये उपचार करण्याचा सल्ला. केएमजे हॉस्पीटलमध्ये सामान्य प्रसूती झाल्यानंतर अधिकरक्तस्त्राव झाल्याने नागपूरच्या डॉ.बारोकर यांच्या रूग्णालयात हलविण्याचा सल्ला. नागपूरच्या आदित्य हॉस्पिटल येथील डॉ. बारोकर यांनी तिला रक्ताच्या गाठी झाल्या आहेत. अधिक रक्तस्त्रावाने किडनी निकामी झाली, संसर्ग झाला आहे.मेंदूने काम करणे बंद केल्याचे अहवालात म्हटले. आयुष क्रिटीकलचे डॉ. गुप्ता यांनी तिला मृत घोषित न करता गंगाबाईत नेण्याचा सल्ला दिला.