शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

विमान खरेदीच्या डाळीत काळेच काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:29 IST

भाजप सरकारने राफेलविमान खरेदी जनतेच्या पैशांनी केली आहे. मात्र खरेदी प्रक्रियेत कित्येक काळे तथ्य सामोर येत आहेत. यामुळे देशातील जनतेसोबतच सेनेचेही मनोबल तुटत आहे. कॉँगे्रसच्या राज्यात ५०० कोटींत मिळणारे विमान भाजप सरकारच्या राज्यात १६०० कोटींचे कसे झाले, हे सरकारने स्पष्ट करायला हवे. कारण विमान खरेदीच्या डाळीत काळेच काळे आहे, असा आरोप आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल यांचा आरोप : जिल्हा कॉँग्रेसचे धरणे आंदोलन, संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजप सरकारने राफेलविमान खरेदी जनतेच्या पैशांनी केली आहे. मात्र खरेदी प्रक्रियेत कित्येक काळे तथ्य सामोर येत आहेत. यामुळे देशातील जनतेसोबतच सेनेचेही मनोबल तुटत आहे. कॉँगे्रसच्या राज्यात ५०० कोटींत मिळणारे विमान भाजप सरकारच्या राज्यात १६०० कोटींचे कसे झाले, हे सरकारने स्पष्ट करायला हवे. कारण विमान खरेदीच्या डाळीत काळेच काळे आहे, असा आरोप आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला.राफेल विमान खरेदीची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी व्हावी तसेच या घोटाळ््यात श्वेतपत्र जाहीर करून संपूर्ण स्थिती देशाला अवगत करावी या मागणीला घेऊन जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्यावतीने सोमवारी (दि.२४) येथील उप विभागायी अधिकारी कार्यालयासमोर आयोजीत धरणे आंदोलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, ‘अच्छे दिन’च्या अपेक्षेने देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला देश व राज्यासह अनेक राज्यातील सत्ता सोपविली. मात्र भाजप सरकारने प्रत्येकच वर्गाला लुटने व धोका देण्याशिवाय काहीच केले नसल्याचेही ते म्हणाले.सरकारी बँंकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊन उद्योगपती फरार होत आहेत. आता हे सर्वविदीत आहे की या उद्योगपतींना फरार होण्यास भाजप सरकारची मदत आहे. निवडणुकीच्या घोषणापत्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे बोलून निवडणुकीनंतर आपले वचन सरकार विसरली. सरकारने कर्जमाफी केली. मात्र कित्येक अटी लावून ७५ टक्के शेतकºयांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचीत ठेवले. कर्जमाफी सोबतच शेतकºयांना १० हजार रूपयांच्या अग्रीम कर्जाची घोषणा करून शासन निर्णय काढण्यात आला. मात्र एकाही शेतकºयाला हे कर्ज मिळाले नाही. भाजप सरकारने सर्व शेतकºयांना एका नजरेतून बघून सर्वच शेतकºयाना कर्जमाफी द्यावी असे आमदार अग्रवाल म्हणाले.कॉंग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी, कोट्यवधींची रक्कम भाजप सरकारने पीक विमा योजनेच्या नावावर वसूल केली. मात्र दुष्काळानंतरही शेतकºयांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला नाही. सन २०१७ मधील दुष्काळ व मावा-तुडतुड्याने नुकसान झालेल्या शेतकºयांना राज्य सरकारने मदत घोषीत केली. मात्र आतापर्यंत त्यांना मदत मिळाली नसल्याचे सांगीतले. प्रास्ताविकातून जिल्हा परिषदेचे माजी सभापती पी.जी.कटरे यांनी, आजचे हे धरणे आंदोलन व नुकतेच तीन राज्यातील कॉँग्रेस सरकारचे गठन म्हणजे सर्वसामान्य नागरिक आता भाजपच्या मनमोहक आश्वासनांच्या पाशातून बाहेर आल्याचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले.जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे यांनी, आज पेट्रोल, गॅस सिलिंडर, रासायनिक खते असो की घरगुती वीज प्रत्येकच वस्तूंचा भाव सरकारने दुप्पट केले आहे. देशात हिंदूू-मुस्लीम समाजातील ताण भाजप राजमुळे असून त्यांचातील भाईचारा खतम करण्याचे काम मोदी सरकार करीत असल्याचा आरोप केला. जिल्हा सचिव राजेश नंदागवळी यांनी, सरकारने आपले अपयश स्वीकारून त्वरीत पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.संचालन महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार पी.जी. कटरे यांनी मानले. याप्रसंगी माजी मंत्री भरत बहेकार, सचिव विनोद जैन, डॉ.योगेंद्र भगत, महिला अध्यक्ष उषा शहारे, आलोक मोहंती, पन्नालाल सहारे, हरिश तुळसकर, के.आर.शेंडे, रामरतन राऊत, झामसिंग बघेले, एन.डी.किरसान, उषा मेंढे, माधुरी हरिणखेडे, चुन्नी बेंद्रे, धनलाल ठाकरे, अनिल गौतम, यादनलाल बनोठे, विक्की बघेले, रमेश अंबुले, लता दोनोडे, विमल नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, गिरीष पालीवाल, विजय टेकाम, दीपक पवार, माधुरी कुंभरे, ज्योती वालदे, सरिता कापगते, चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, शेषराव गिरेपूंजे, भागवत नाकाडे, संदीप भाटीया यांच्यासह मोठ्या संख्येत कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रपतींच्या नावाने दिले मागण्यांचे निवेदनराफेल विमान खरेदी प्रकरणाला घेऊन आयोजीत धरणे आंदोलन व सभेनंतर विमान खरेदीची वर्तमान स्थिती स्पष्ट करावी. तसेच विमान खरेदीची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी व श्वेतपत्र जाहीर करून संपूर्ण स्थितीने देशाला अवगत करण्याची मागणी करीत उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना आमदार अग्रवाल यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावाने निवेदन दिले.