शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य मुद्यांवरून लक्ष भटकविण्याचे भाजपचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:24 IST

राजकारणात धर्माची प्रमुख भूमिका असावी. मात्र धर्माचे राजकारण करणे हे योग्य नाही. आज भाजप सरकार देश व राज्यात धर्माच्या नावावर देशवासीयांना आपसांत वाटून देशाच्या विकासात अडचण निर्माण करीत आहे. धर्माचे राजकारण करून मुख्य मुद्दयांवरून लोकांचे लक्ष भटकाविण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांना केला.

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे पाटील : नागरा येथे २ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राजकारणात धर्माची प्रमुख भूमिका असावी. मात्र धर्माचे राजकारण करणे हे योग्य नाही. आज भाजप सरकार देश व राज्यात धर्माच्या नावावर देशवासीयांना आपसांत वाटून देशाच्या विकासात अडचण निर्माण करीत आहे. धर्माचे राजकारण करून मुख्य मुद्दयांवरून लोकांचे लक्ष भटकाविण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांना केला.लगतच्या ग्राम नागरा येथे २ कोटींच्या निधीतून होणाऱ्या विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी शुक्रवारी (दि.११) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. पुढे बोलताना डॉ. पाटील यांनी, आज देशातील तरूण बेरोजगार आहे, शेतकरी आत्महत्या करीत आहे, व्यापाºयांचे उद्योगधंदे चौपट होत आहेत. असे गंभीर विषय सोडून मात्र भाजप धर्माचे राजकारण करीत आहे. मात्र आता मतदार भाजपच्या घोषणांनी त्रस्त झाले असून मोदींनी दाखविलेला ‘अच्छे दिन’चा मायाजाल तुटल्याचे ५ राज्यांतील निवडणूक निकालांनी स्पष्ट झाले आहे. देशातील भाजप सरकारला आता निरोप देण्याचा निर्धार देशवासीयांनी घेतल्याचे मत व्यक्त केले.माजी आमदार आशिष देशमुख यांनी, विधानसभेतील सर्वात अनुभवी व्यक्ती आमदार गोपालदास अग्रवाल असून विधानसभेत त्यांच्याकडून पुष्कळ काही शिकण्यास मिळाल्याचे सांगीतले. तर प्रास्तावीकातून जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वैरागकर यांनी, मिळालेल्या २ कोटींच्या निधीतून बालाघाट रोड-मंदिर रस्ता सिमेंटीकरण व पथदिवे, शिव मंदिर-भैरव मंदिर रस्ता डांबरीकरण, शिव मंदिर व भैरव मंदिर आवारभिंत दुरूस्ती व सौंदर्यीकरण, स्वागत द्वार, तलावाजवळ प्रसाधनगृह व २ कक्ष, सभागृह, मंदिर परिसरात पहिल्या माळ््यावर भक्त निवास, ३ विंधन विहीर व पंप, मंदिर परिसरात गट्टूकरणाचे काम केले जाणार असल्याची माहिती दिली.संचालन करून आभार कॉँग्रेस कमिटीचे शहर महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी मानले.कार्यक्रमाला अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटी सचिव आशिष दुआ, जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी, रमेश लिल्हारे, रमेश अंबुले, लता दोनोडे, माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, पुष्पा अटराहे, रणजीतसिंह गौर, प्रशांत लिल्हारे, शैलेश गौर, दिलीप लिल्हारे, जय बुडेकर, मुन्ना नागपूरे, योगेश लिल्हारे, अमृतलाल पतेह, दुर्गाप्रसाद धांदे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.नागराला ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न - अग्रवालमोठ्या संघर्षानंतर नागराला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राच दर्जा मिळविता आला. जिल्ह्यातील या प्राचीन तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी सतत प्रयत्न केल्याने आज शिव मंदिर परिसरात बदल दिसून येत आहे. भविष्यात नागराला ‘अ’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सांगीतले. शिव मंदिर पोहचण्यासाठी गावात बायपास मार्गासाठी भूमि अधिग्रहणाचे काम सुरू असून लवकरच बायपास मार्गाच्या बांधकामाला गती दिली जाणार असल्याचे सांगीतले.