शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चार जागांसाठी भाजपची ‘अग्निपरीक्षा’

By admin | Updated: June 21, 2015 01:07 IST

तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. प्रमुख राजकीय पक्षात उमेदवारीसाठी शक्तीप्रदर्शन सुरू आहे.

संतोष बुकावन  अर्जुनी मोरगावतालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. प्रमुख राजकीय पक्षात उमेदवारीसाठी शक्तीप्रदर्शन सुरू आहे. कुणाला उमेदवारी द्यायची व कुणाकुणाची समजूत घालायची अशा पेचात पक्षश्रेष्ठी अडकले आहेत. इकडे आड आणि तिकडे विहीर असे संकट राजकीय पक्षात निर्माण झाले आहेत. संभाव्य उमेदवार हे पक्ष सोडणे अथवा बंडखोरी करण्याची भिती दाखवत आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७ जिल्हा परिषद व १४ पंचायत समितीच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीत अद्यापही चार जागांबाबत ‘सस्पेन्स’ आहे. खा.नाना पटोले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मूळच्या भाजपवासीयांनी काही काळापर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांना स्वीकारले, मात्र मनातून नव्हे. खा.पटोले हे भाजपमध्ये असले तरी त्यांचे जीवलग कार्यकर्ते दु:खी आहेत. विधानसभा निवडणुकीत या कार्यकर्त्यांनी ना.राजकुमार बडोले यांच्याविरोधात काम केले असा आरोप करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. हाच दल तालुक्यात पटक दल म्हणून ओळखला जातो. तालुका अध्यक्ष रघुनाथ लांजेवार यांना उमेदवारी मिळण्याच्या शक्यतेने पं.स.सदस्य किशोर तरोणे यांनी हाताला ‘घड्याळ’ बांधले. त्यांनी १२ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन पक्षाला हादरा दिला.बोंडगावदेवी व माहुरकुडा जिल्हा परिषद तसेच बोंडगावदेवी व निमगाव पं.स. मध्ये उमेदवारीसाठी प्रचंड चुरस आहे. अद्यापही भाजपने उमेदवार घोषित केले नाही. येथे केवळ नावाच्या अफवा सुरू आहेत. ऐनवेळी ए.बी. फार्म येण्याची शक्यता आहे. बोंडगावदेवी येथे कमल प्रमोद पाऊलझगडे व कल्पना लायकराम भेंडारकर यांनी भाजपची उमेदवारी मागितली. पाऊलझगडे या विद्यमान अपक्ष उमेदवार प्रमोद पाऊलझगडे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी पं.स.च्या मागील कार्यकाळात भाजपशी हातमिळवणी केली व यावेळी पत्नीसाठी भाजपकडून उमेदवारी मागीतली. याच गटातून भाजपचे महामंत्री लायकराम भेंडारकर यांनी पत्नी कल्पना यांचेसाठी उमेदवारी मागितली. याच जि.प. गटाच्या निमगाव पं.स. गणातून लायकराम भेंडारकर व जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांनी नामनिर्देश पत्र दाखल केले. कमल पाऊलझगडे यांना बोंडगावदेवी जि.प.ची उमेदवारी जर दिली तर आम्ही पं.स. निमगावची जागा लढणार नाही, असा आक्रमक पवित्रा लायकराम भेंडारकर व अरविंद शिवणकर यांनी घेतला असल्याचे कळते. त्यामुळे येथील रुसवे फुगवे शमविण्याची कसरत पक्षश्रेष्ठींना करावी लागणार आहे. माहुरकुडा जि.प. गटात उमेदवारीसाठी घमासान युद्ध सुरू आहे. येथून भाजपतर्फे ललीत बाळबुद्धे, काशिम जमा कुरेशी, उमाकांत ढेंग़े, प्रदीप मस्के व खुशाल नाकाडे यांनी उमेदवारी मागितली. ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी जागा राखीव असल्यामुळे सर्वाधिक चढाओढ येथे दिसून येते. बाहेरची ‘पार्सल’ या गटात नको अशी भूमिका भाजपच्या ललीत बाळबुद्धे, खुशाल नाकाडे यांनी यापूर्वीच घेतली. तसे पत्रकही परिसरात वाटप केले. त्यांच्या दुदैवाने खुशाल नाकाडे यांचे नामनिर्देशन पत्र अस्विकृत करण्यात आले. सर्वसाधारण जागेवर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराची वर्णी लागावी यासाठी कुरेशी यांनी उमेदवारी दाखल केली. उमाकांत ढेंगे हे ना.बडोले यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्या उमेदवारीला त्या क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांचाच विरोध आहे. त्यामुळे येथे कुणाला उमेदवारी द्यायची हे चित्र धुसर आहे. येथे कुणालाही उमेदवारी दिली तरी असंतुष्टाची संख्या भरपूर असणार आहे.महागाव जि.प. गटासाठी भाजपतर्फे प्रभाकर कोवे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. येथे पं.स. सभापती तानाजी ताराम यांनी सुद्धा भाजपतर्फे उमेदवारी दाखल केली. येथील भाजपचे पं.स. सदस्य जागेश्वर भोगारे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल करुन सर्वांना आश्चर्यचकित केले. इतर ठिकाणी गटाबाहेरचा उमेदवार चालत असेल तर मला उमेदवारी का नाही, ही भूमिका स्विकारुन ताराम यांनी अर्ज दाखल केला आहे.