शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेना एका नाण्याच्या दोन बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : मागील ४ वर्षांपासून विकास कामे खोळंबली असून विकासकामांची सरकारने वाट लावली. शिवसेना आणि भाजपा ...

ठळक मुद्देअशोक चव्हाण : काँग्रेस जनसंघर्ष यात्रा सडक-अर्जुनीत

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : मागील ४ वर्षांपासून विकास कामे खोळंबली असून विकासकामांची सरकारने वाट लावली. शिवसेना आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू असून आपण दोेघे भाऊ-भाऊ सर्वकाही वाटून खावू, अशा म्हणीप्रमाणे सरकार चालत आहे. या सरकारला अधिकारी, बेरोजगार आणि व्यापारी कंटाळले म्हणून अशा सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे विचार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.काँग्रेस पक्षातर्फे धानाला २५०० रुपये हमीभाव व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी असे मुद्दे घेवून काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेच्या येथील दुर्गा चौकात शुक्रवारी (दि.११) आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. सभेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ. नशिम खान, माजी. आ. सेवक वाघाये, माजी आ. रामरतन राऊत, आ. गोपालदास अग्रवाल, संघर्ष यात्रेचे संयोजक आशिष दुआ, बबनराव तायवाडे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, जि.प.सदस्य सरिता कापगते, अर्जुनी-मोरगाव विधानसभा प्रमुख रत्नदीप दहिवले, राजेश नंदागवळी, डॉ. बबन कांबळे, गायत्री इरले, माया चौधरी, मिरा झोडवणे, रियान शेख, निशांत राऊत, शेषराव गिऱ्हेपुंजे, राजू पटले, अनिल राजगिरे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी विखे पाटील यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात ४ वर्षापासून अभ्यासच करीत असून त्यामध्ये ते फेल झाले आहे. घरघुती गॅस सिलींडरचे भाव वाढले आहे. धानाला भाव नाही. कर्जमाफीसाठी तीन ते चार वेळा निकष बदलले परंतु त्यांना जमू शकले नाही. त्यामुळे या सरकारला धडा शिकवणे आवश्यक असून याकरिता ही जनसंपर्क यात्रा काढण्यात आली असल्याचे सांगीतले. प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेषराव गिऱ्हेपुंजे यांनी मांडले. संचालन राजू पटले यांनी केले. आभार अनिल राजगिरे यांनी मानले.