शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने शेतकऱ्यांची केली बोळवण

By admin | Updated: July 24, 2016 00:05 IST

केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार आहे. या सरकारने भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी मदत केलेली नाही.

राजेंद्र जैन यांचा आरोप : राष्ट्रवादी महिला काँगे्रसची विस्तारीत बैठक, महिलांची लक्षणीय उपस्थिती भंडारा : केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार आहे. या सरकारने भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी मदत केलेली नाही. शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळाला नसल्याने बळीराजाचे बोळवण होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेंद्र जैन यांनी केला आहे. भंडारा जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसची विस्तारीत बैठक आज शुक्रवारला पार्टी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हा आरोप लावला आहे. या बैठकीला माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जिल्हा परिषद सभापती शुभांगी रहांगडाले, महिला प्रदेश महासचिव सुनंदा मुंडले, महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी जैन यांनी सरकारने विद्युत बिल वाढविल्यामुळे महिलांच्या घरचा आर्थिक बजेट बिघडला आहे. मागील दोन वर्षात केंद्र व राज्य सरकारने बेरोजगारांना नौकरी दिलेल्या नाहीत. त्यामुळे बेरोजगारांची फसवणुक झाली आहे. पक्ष वाढीकरीता महिलांनी कार्य करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. मधुकर कुकडे यांनी शरद पवार व खासदार प्रफुल पटेल यांचे विचार प्रत्येक घरात पोहचविण्याचे आवाहन केले. यावेळी नवीन महिला जिल्हा कार्यकारणी व तालुका अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाला नगरपरिषद उपाध्यक्ष कविता भोंगाडे, तुमसर न.प. उपाध्यक्ष सरोज भुरे, जि.प. सदस्य ज्योती खवास, मनोरथा जांभुळे, प्रेरणा तुरकर, रेखा ठाकरे, विजया चोपकर, जुमाला बोरकर, करूणा घोरमारे, मनिषा गायधने, पमा ठाकूर, शुभांगी श्रृंगारपवार, किसनाबाई भानारकर, उर्मिला आगाशे, संगिता सुखानी, अनिता साठवणे, माधुरी देशकर, यांच्यासह महिला कार्यकर्त्या होत्या. संचालन प्रियदर्शनी शहारे यांनी केले. प्रास्ताविक कल्याणी भुरे यांनी केले तर आभार राजकुमारी बावनकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)