शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारची पीक विमा योजना फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:20 IST

भाजप सरकारच्या राज्यात प्रत्येकालाच ठगल्यासारखे वाटत आहे. शेतकरी कर्जमाफीची योजना पुढे करून त्यावर अनेक शर्ती लावण्यात आल्या. परिणामी कित्येक शेतकरी त्यातून बाहेर करण्यात आले. तर कित्येक आजही कर्जमाफीच्या पतीक्षेत आहेत. तोच प्रकार पीक विमा योजनेचा आहे. कोट्यवधी रूपये पीक विम्याच्या नावावर जमा केले. मात्र दुष्काळानंतरही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. भाजप सरकारची पीक विमा योजना फेल ठरल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम बिरसोला येथील विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजप सरकारच्या राज्यात प्रत्येकालाच ठगल्यासारखे वाटत आहे. शेतकरी कर्जमाफीची योजना पुढे करून त्यावर अनेक शर्ती लावण्यात आल्या. परिणामी कित्येक शेतकरी त्यातून बाहेर करण्यात आले. तर कित्येक आजही कर्जमाफीच्या पतीक्षेत आहेत. तोच प्रकार पीक विमा योजनेचा आहे. कोट्यवधी रूपये पीक विम्याच्या नावावर जमा केले. मात्र दुष्काळानंतरही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. भाजप सरकारची पीक विमा योजना फेल ठरल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम बिरसोला येथील ६० रूपयांच्या निधीतून निर्मित अंतर्गत सिमेंट रस्त्याचे लोकार्पण व ३ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर बाजार मैदानातील गट्टू लावण्याच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य लोकचंद दंदरे होते. त्यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रात विकास कामांना गती मिळाली आहे. यामुळेच जेथे विकास कामांचा विषय निघतो तेथे आमदार अग्रवाल यांचे नाव पुढे येत असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाला तहसीलदार सारंग, चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, बबीता देवाधारी, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, देवेंद्र मानकर, कत्तेलाल मातरे, निर्वता पाचे, झनकसिंग तुरकर, दिलीप तुरकर, कपूरचंद पाचे, रामभगत पाचे, कांती पाचे, डॉ. देवा जमरे, कविता दंदरे, सरोजनी दंदरे, डिलेश्वरी पाचे, प्रिती तुरकर, सुरवन पाचे, नेतलाल मात्रे, केशव नागफासे, संजय देवाधारी, बालाराम खैरवार, रूखी पाचे, माणिकचंद तुरकर, सोमेश्वरी पाचे, शामराव तुरकर, कैलाश देवाधारी, मोहपत खरे, अमृत तुरकर, तपेश सोनवाने यांच्यासह कॉँग्रेस कार्यकर्ता व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.वैयक्तिक लाभ शिबिराचे आयोजनया कार्यक्रमाचे निमित्त साधून आमदार अग्रवाल यांच्या उपस्थितीत वैयक्तीक लाभ योजनांचे शिबिर घेण्यात आले. यात ४५ उत्पन्न प्रमाणपत्र, ३० वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र व ४६ ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच श्रावणबाळ योजनेचे ३०, रेशनकार्डचे १८, सेतू ३१ व मतदार यादीबाबत ११ अर्ज प्राप्त झाले. शिवाय आमदार अग्रवाल यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांना सोडविण्याचे निर्देश संबंधीत अधिकाºयांना दिले.