शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजप जिल्हाध्यक्षपदी पटले

By admin | Updated: January 18, 2016 02:04 IST

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार हेमंत पटले यांची निवड करण्यात आली आहे.

माजी जिल्हाध्यक्षच बनले सूचक : सर्वानुमते घेण्यात आला निर्णय गोंदिया : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार हेमंत पटले यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी (दि.१७) येथील शासकीय विश्रामगृहात पक्षातील वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नवीन जिल्हाध्यक्षांची निवड करावयाची होती. जिल्हाध्यक्षपदासाठी यावेळी माजी आमदार हेमंत पटले, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार केशव मानकर, निष्ठावान येसुलाल उपराडे, माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे यांची नावे चर्चेत होती. दरम्यान रविवारी (दि.१७) येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष निवडीला घेऊन पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. पक्ष पर्यवेक्षक अशोक धोटे, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, पालकमंत्री राजकुमार बडोले, जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्यासह आजी-माजी आमदार व पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. बैठकीत अग्रवाल यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी हेमंत पटले यांचे नाव सूचविले तर त्यांच्या नावावर सर्व नेत्यांनी एकमताने हिरवी झेंडी दाखविली. विशेष म्हणजे पटले यांची दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)