शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

भाजपने मारली मुसंडी

By admin | Updated: May 17, 2014 00:17 IST

संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या भंडारा-गोंदिया मतदार संघात पुन्हा एकदा भाजपला कौल देत मतदारांनी नाना पटोले यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ घातली.

गोंदिया/भंडारा : संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या भंडारा-गोंदिया मतदार संघात पुन्हा एकदा भाजपला कौल देत मतदारांनी नाना पटोले यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ घातली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा १ लाख ४९ हजार ८३६ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे गेल्यावेळच्या (२00९) लोकसभा निवडणुकीत चौथ्या स्थानावर राहिलेल्या बसपासह यावेळी चर्चेत आलेल्या आम आदमी पार्टीच्या आणि इतर सर्वच पक्षाच्या व अपक्ष उमेदवारांची यावेळी जमानत जप्त झाली.

नाना पटोले यांना एकूण ६ लाख ६ हजार १२९ मते मिळाली तर पराभूत उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना ४ लाख ५६ हजार ८७५ मते मिळाली. सायंकाळी ७.३0 पर्यंत अंतिम निकाल जाहीर होणे बाकी होते. मात्र पटोले यांच्या विजयाचा कल दुपारी १२ वाजताच स्पष्ट झाला होता. त्यामुळे भंडारा आणि गोंदियात कार्यकर्त्यांचा जल्लोष दुपारपासूनच सुरू झाला होता. फटाके उडवत, गुलाल उधळत आणि ढोलताशावर नाचत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

सकाळी ८ वाजता सुरक्षा यंत्रणेच्या कडक बंदोबस्तात भंडारा येथील सामाजिक न्याय भवनात मतमोजणीला सुरूवात झाली. यावेळी सामाजिक न्याय भवनाकडे जाणार्‍या सर्व मार्गावर पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. परिसरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी निरीक्षण मनोरे उभारण्यात आले होते. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्षात व्यवस्था करण्यात आली होती.

विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासूनच नाना पटोले यांनी आघाडी घेतली. ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींचा चांगलाच भ्रमनिरास झालेला दिसत होता. अनेकांनी दुपारी १२ नंतर तेथून काढता पाय घेतला. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास नाना पटोले यांनी सजविलेल्या वाहनावरून भंडार्‍यात मिरवणूक काढली. मात्र मिरवणुकीला अधिकृत परवानगी नसल्यामुळे कोणताही बँड वगैरे न लावताच ते खुल्या जीपवरून फिरले. निकाल ऐकण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणावर भाजप कार्यकर्ते भंडार्‍यात दाखल झाले होते.