शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे नगरसेवक राजस्थानच्या सहलीवर

By admin | Updated: July 27, 2014 00:10 IST

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता राजकीय खेळी सुरू झाली आहे. पालिकेतील संख्याबल बघता यावेळी भाजप-सेनेला लॉटरी लागण्याची पूर्ण शक्यता आहे. ही संधी हातून जाऊ नये

गोंदिया : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता राजकीय खेळी सुरू झाली आहे. पालिकेतील संख्याबल बघता यावेळी भाजप-सेनेला लॉटरी लागण्याची पूर्ण शक्यता आहे. ही संधी हातून जाऊ नये व आपले सदस्य फुटून सत्तापक्षाच्या संपर्कात येऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना राजस्थानच्या सहलीवर पाठविण्यात आले आहे.येत्या ६ आॅगस्ट रोजी नगराध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे हे पद आपल्याकडेच रहावे यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची जोड-तोड सुरू झाली आहे. मात्र पालिकेत सदस्य संख्याबल बघता कॉंग्रेसकडे पाच, राष्ट्रवादीचे ११ व अपक्ष दोन असे एकूण १८ सदस्य आहेत. तर भाजपचे सर्वाधीक १६ व शिवसेनेचे तीन असे एकूण १९ सदस्य आहेत. यामुळे पालिकेत आजघडीला सर्वाधिक सदस्य संख्या भाजप-सेना युतीची असून ही संधी हातून जाऊ देण्यास भाजप-सेना तयार नाही. मात्र फोडा-फोडीच्या राजकारणात काहीही शक्य असल्याचे यापूर्वीही नगर पालिकेत दिसून आले आहे. यामुळेच कुठल्याही प्रकारची ‘रिस्क’ न पत्करता भाजपने आपल्या सदस्यांना आतापासूनच राजस्थान सरकारचे पाहुणे म्हणून पाठविले आहे. गुरूवारी (दि.२४) भाजपचे १२ सदस्य राजस्थानकडे रवाना झाले आहेत. उर्वरीत चार सदस्य अद्यापही गोंदियातच आहे. त्यातील तीन सदस्य रविवारी (दि.२८) रवाना होणार असल्याची माहिती आहे. काँगे्रसच्या तीन सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊन त्यांचा मतदानाचा अधिकार सुद्धा यामुळे संपुष्टात आला आहे. हीच बाब भाजप-सेना युतीसाठी लकी ठरत आहे. अशात भाजपचे १६ सदस्य असल्याने त्यांच्याकडे अध्यक्षपद व शिवसेनेचे तीन सदस्य असल्याने त्यांना उपाध्यक्षपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदासाठी भाजपमधून अनिल पांडे, कशिश जायस्वाल, घनश्याम पानतवने व भावना कदम यांच्या नावांची चर्चा आहे. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेकडे हर्षपाल रंगारी व लता रहांगडाले यांच्यातून एकाची निवड केली जाईल. संख्येच्या आधारावर भाजप-सेना युतीकडून हे सर्व समिकरण लावले जात असले तरीही कॉंग्रेस-राष्ट्रवादी एवढ्या सहजासहजी खुर्ची सोडणार नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. यामुळेच भाजपने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आपल्या नगरसेवकांना राजस्थानला रवाना करून दिले. तिथेच सर्व सदस्य एकत्रित होणार असून निवडणुकीपर्यंत राजस्थानमध्येच राहणार असल्याचीही माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)