शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आणि कॉँग्रेस आमने- सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:43 IST

नगर परिषदेने बैठकी बाजार वसुलीसाठी काढलेल्या निविदेला घेऊन आता विरोधी पक्षातील कॉँग्रेसचे सदस्य चांगलेच खवळले असून त्यांनी निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देबाजार वसुली निविदा प्रकरण : बाजार वसुली निविदा रद्द करण्याची कॉँग्रेसची मागणी

ऑनलाईन लोकमतगोंदिया : नगर परिषदेने बैठकी बाजार वसुलीसाठी काढलेल्या निविदेला घेऊन आता विरोधी पक्षातील कॉँग्रेसचे सदस्य चांगलेच खवळले असून त्यांनी निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. यासाठी कॉँग्रेसच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी व आमदारांना निवेदन दिले आहे. एकंदर यानंतर नगर परिषदेत भारतीय जनता पक्ष व कॉँग्रेस पक्ष आमने-सामने आल्याचे दिसून येत आहे. अशात आता हे प्रकरण काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ कलम २७२ अंतर्गत बैठकी बाजार वसुली केली जात होती. मात्र नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या त्यांच्या पदग्रहण समारंभात बैठकी बाजार वसुली बंद करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेमुळे बाजारात दुकान लावणाऱ्यांकडून वसुलीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैसे दिले जात नव्हते. अशात मात्र नगर परिषदेला बैठकी बाजारातून येत असलेल्या सुमारे सात लाख रूपयांच्या उत्पन्नावर पाणी फेरले गेले. अचानक हे उत्पन्न बंद झाल्याने नगर परिषदेची आर्थिक अडचण वाढली. विशेष म्हणजे, बाजार वसुली बंद करताना तेवढ्याच उत्पन्नाची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी असे अधिनियमात नमूद आहे.मात्र नगराध्यक्षांच्या या निर्णयाने बाजार वसुली बंद झाली व पर्यायी व्यवस्था काहीच करण्यात आली नव्हती. यावर बाजार विभागाने पर्यायी व्यवस्था करण्यासाठी स्टेडियम चौपाटी व खोजा मस्जीद फुटपाथ वरील दुकानदारांकडून मासीक एक हजार रूपयांची वसुली सुरू केली. मात्र या दुकानदारांक डूनही प्रतिसाद मिळत नव्हता. परिणामी बैठकी बाजार वसुलीसाठी नगर परिषदेने निविदा काढून लिलाव करण्याचे ठरविले. त्यानुसार, बाजार विभागाने १० मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध करून निविदा मागविली.हा प्रकार मात्र नगर परिषदेत विरोधी पक्षात असलेल्या क ॉँग्रेस पक्षातील सदस्यांना पटला नाही. यामुळे त्यांनी नगर परिषदेने बैठकी बाजार वसुलीसाठी काढलेली निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीसाठी कॉँग्रेसच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील व आमदार गोपालदास अग्रवाल यांना निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे,या निवेदनातून कॉँग्रेस सदस्यांनी निविदा त्वरीत रद्द न केल्यास कॉँग्रेस पक्ष तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला आहे. क ॉँग्रेस पक्षाच्या या भूमिकेमुळे नगर परिषदेत आता भाजप व कॉँग्रेस आमने-सामने आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण काय वळण घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.स्वत:च्या चुकीवर पडदा घालण्याचा प्रकारकाँग्रेस पक्षाने दिलेल्या निवेदनानुसार, नगराध्यक्षांनी केलेल्या घोषणेमुळे हा सर्व प्रकार घडला आहे. नियमांना बाजूला सारून त्यांनी ही घोषणा केली असून याबाबत कोणत्याही सभेत ठराव घेण्यात आलेला नाही. तर यांतरही नियमांना पुन्हा बाजूला सारून प्रस्ताव न ठेवता आपल्या चुकीवर पडदा घालण्याचा प्रकार केला जात आहे. शिवाय शहरातील जनता शांतीप्रीय असून बाजार वसुली कंत्राटी तत्वावर दिल्यास शहरातील शांती भंग होण्याची चिन्हे आहेत. कंत्राटदार आपल्या मर्जीने वसुली करणार व त्यावर नगर परिषदेचे अंकुश राहणार नसल्याचेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे बैठकी बाजार वसुलीची निविदा त्वरीत रद्द करण्याची मागणी नगर परिषद विरोधी पक्ष नेता व बांधकाम समिती सभापती शकील मंसुरी, माजी सभापती राकेश ठाकूर, नगर परिषद सदस्य क्रांती जायस्वाल, सुनील भालेराव, सुनील तिवारी, भागवत मेश्राम, दिपीका सुरे, श्वेता पुरोहीत, शिलू ठाकूर, निर्मला मिश्रा व पराग अग्रवाल यांनी केली आहे.