शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गोंदियात भाजपचे आंदोलन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:26 IST

गोंदिया : महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी आरोप करीत त्यासंबंधीचे ...

गोंदिया : महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी आरोप करीत त्यासंबंधीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. या लेटरबाॅम्बनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. या प्रकरणावर महाराष्ट्र सरकार पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करीत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली. तसेच या विरोधात रविवारी सकाळी शहरातील जयस्तंभ चाैकात निदर्शने करण्यात आली.

भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचारी असे विविध नारे लावत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला. गोंदिया शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा महात्मा गांधी चौकात पोहचला. या चौकात निदर्शने करून मोर्चाची सांगता करण्यात आली. मोर्चा सुरू झाला त्यावेळी शहर पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला होता. यावर पत्रकारांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी याला दुजोरा देताना सांगितले की भाजपच्या कार्यकर्त्यांनी परवानगी न घेता मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी माेर्चा अडविला होता. कोविडची साथ सुरू असल्यामुळे माेर्चा काढू नये असे पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले. परंतु यात चर्चा करून मार्ग काढण्यात आल्याचे सांगितले. या मोर्चात माजी आमदार गोपालदास अग्रवाल, नगरसेवक राजकुमार कुथे, संजय कुळकर्णी, धनलाल ठाकरे व इतरांचा समावेश होता.