शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

विपरित परिस्थितीवर मात करीत बिरसीच्या अजयची भरारी

By admin | Updated: June 18, 2014 00:15 IST

पोटाची खळगी भरण्याच्या लगबगीत शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. परंतु पोटाची आग विझवित शाळेतही नेत्रदीपक कामगिरी करणे एखाद्यालाच जमते करतो. घरात असलेल्या अठराविश्व दारिद्रयावर मात करीत

नरेश रहिले - गोंदियापोटाची खळगी भरण्याच्या लगबगीत शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. परंतु पोटाची आग विझवित शाळेतही नेत्रदीपक कामगिरी करणे एखाद्यालाच जमते करतो. घरात असलेल्या अठराविश्व दारिद्रयावर मात करीत दहावीसारख्या बोर्डाच्या परीक्षेत ८३.४० टक्क्यांपर्यंत गुणांची मजल मारणाऱ्या आमगाव तालुक्यातील बिरसी येथील अजय राजकुमार सोनवाने याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा परिषद हायस्कूल आमगाव येथे शिकत असलेला हा हा गरीब कुटूंबातील मुलगा आहे. त्याचे आई-वडील मोलमजूरी करून संसार चालविण्याचा खटाटोप करतात. परंतु वाढत्या महागाईमुळे त्यांचे जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे आई-वडीलांना हातभार लावण्याच्या हेतूने अजयने मागील एक-दीड वर्षापासून आमगाव येथील वैशाली मेडीकल दुकानात पार्टटाईम नोकरी स्वीकारली. शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर औषधी दुकानात काम करून मिळालेल्या पैशातून शैक्षणिक साहित्य खरेदी करणे, उर्वरीत पैसे घर चालविण्यासाठी आई-वडीलांना देणे हे त्याचे काम होते. वडील राजकुमार व आई पुस्तकला हे दोघेही मोलमजूरी करून आपला संसार सुखी करण्याचे स्वप्न पहात आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आई-वडीलांच्या कामात हातभार लागेल, या आशेने अजयने अर्धवेळ नोकरी पत्करली. सकाळी ५ वाजता उठणे, त्यानंतर अभ्यास करणे, सकाळी ९ ते ११ वाजतादरम्यान औषधी दुकानात कामाला जाणे त्यानंतर शाळेच्या वेळात शाळेत जाणे, शाळेतून सुट्टी झाल्यावर रात्री आठ वाजतापर्यंत पुन्हा औषधी दुकानात जाणे व रात्री अभ्यास करणे हा त्याचा नित्यक्रम होता. शाळेतील वेळ तो वाया घालवित नसे. यामुळे अजयने ८३.२० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला.