शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आमसभेअभावी विकासकामांना खीळ

By admin | Updated: July 27, 2016 02:09 IST

जानेवारी महिन्यात झालेल्या आमसभेनंतर आता सात महिन्यांच्या काळात नगर परिषदेची आमसभा झालीच नाही.

सात महिन्यांत एकच आमसभा : या महिन्यात मुहूर्त नाहीच गोंदिया : जानेवारी महिन्यात झालेल्या आमसभेनंतर आता सात महिन्यांच्या काळात नगर परिषदेची आमसभा झालीच नाही. आमसभा न झाल्यामुळे कित्येक विकासकामे सभेच्या मंजूरी अभावी अडकून पडली आहेत. याचा परिणाम मात्र शहराच्या विकासावर होत आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता आमसभेकडे लागल्या आहेत. नगर परिषद अधिनियम १९६५ कलम ८२ अन्वये पालिकेची आमसभा दर दोन महिन्यांत घेणे बंधनकारक आहे. अध्यक्षांच्या मागणीवरून ही आमसभा बोलाविली जात असून सभेची विषयसूची अध्यक्ष तयार करतात. यामुळे वेळेवर आमसभा घेणे ही एक प्रकारे अध्यक्षांचीच जबाबदारी आहे. गोंदिया नगर परिषदेत मात्र यावर्षात जानेवारी महिन्यात आमसभा झाली असून त्यानंतर आतापर्यंत आमसभा घेण्यात आलेली नाही. पाच लाखांच्या आतील धोरणात्मक किंवा वित्तीय कामासाठी स्थायी समितीची परवानगी आवश्यक आहे. तर पाच लाखांच्यावरील धोरणात्मक किंवा वित्तीय कामासाठी आमसभेची परवानगी असणे आवश्यक आहे. यासाठी पालिकेला दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेणे बंधनकारक आहे. मात्र आमसभा झाली नसल्याने नगर परिषदेसह सदस्यांची सुमारे ५० च्यावर कामे मंजूरीसाठी अडकून पडली आहेत. नगराध्यक्षांना वेळेवर आमसभा घेता यावी यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून त्यांना सुचीत केले जाते. त्यानुसार नगराध्यक्षांना प्रशासनाकडून चार-पाच वेळा सुचीत करण्यात आले आहे. शिवाय एकदा जिल्हाधिकाऱ्यांनाही सुचीत करण्यात आले आहे. मात्र अद्याप आमसभेचा मुर्हूत काही निघालेला नाही. (शहर प्रतिनिधी)