शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सिरेगावबांधात बिबटची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:04 IST

तालुक्यातील ग्राम सिरेगावबांध येथे बिबटची दहशत असून त्याने अनेक पशूंची शिकार केल्याचे गावकरी सांगतात. वनविभागाला याची सूचना देऊनही सीमावादाच्या कारणावरून चालढकल केली जात असल्याचे समजते. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देपशूंची केली शिकार : वनविभागाची चालढकल

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील ग्राम सिरेगावबांध येथे बिबटची दहशत असून त्याने अनेक पशूंची शिकार केल्याचे गावकरी सांगतात. वनविभागाला याची सूचना देऊनही सीमावादाच्या कारणावरून चालढकल केली जात असल्याचे समजते. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.सिरेगावबांध येथे गेल्या महिन्याभरापासून बिबटची दहशत आहे. सिरेगावबांध नजीकच्या जंगलाला लागून नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प आहे. २८ मे च्या रात्री गावातील मोतीराम हातझाडे यांचा वासरू, काही दिवसानंतर बाळकृष्ण कापगते यांचे दोन बकरे, प्रभू मरसकोल्हे यांचा पाळीव कुत्रा व ५ आॅगस्टच्या रात्री कृष्णा सुखदेवे यांच्या गोठ्यात बांधलेला बकरा बिबट्याने फस्त केला. गावातील असंख्य कोंबड्यांची शिकार केल्याचे गावकरी सांगतात.सिरेगावबांध येथील विद्यार्थी सानगडी येथे शिकायला जातात. त्यांनी भिवाखिडकी ते सानगडी या ८ किमी. च्या परिसरात भरिदवसा रस्त्याच्या कडेला एकापेक्षा अधिक बिबट समूहाने असल्याचे बघितले आहे.सिरेगाव हा गोंदिया जिल्ह्याच्या महसूल मंडळात येतो. तर वनक्षेत्र हा भंडारा जिल्ह्यात येतो. सरपंच दादा संग्रामे व गावकऱ्यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या वन व महसूल विभागाकडे तक्र ारी केल्या. दोन्ही जिल्ह्यांचे अधिकारी हा क्षेत्र आमच्या जिल्ह्यात येत नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे सीमावादाच्या चक्र व्यूहात अडकलेल्या गावकऱ्यांनी दाद मागायची कुणाकडे हा प्रश्न निर्माण झाला आहे.यापूर्वी याच परिसरात मीराबाई शामराव बहेकार (गुढरी) या महिलेला २८ डिसेंबर २०१२ रोजी व भाग्यश्री रामकृष्ण नेवारे (भिवाखिडकी) या बालिकेला ४ जानेवारी २०१३ रोजी मादी बिबटने ठार करून फस्त केले होते.घटनेमुळे उद्विग्न झालेल्या जमावाने तहसीलदारांच्या वाहनांचे काच फोडून संताप व्यक्त केला होता. पुन्हा सुरू असलेल्या बिबटच्या धुमाकुळामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. वन व महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्या