शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

माल्ही परिसरात बिबट मृतावस्थेत आढळला ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:31 IST

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील वडेगाव माल्ही परिसरातील एका नाल्याजवळ एक बिबट मृतावस्थेत आढळल्याची घटना बुधवारी (दि.१९) सायंकाळी ६.३० वाजेच्या ...

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील वडेगाव माल्ही परिसरातील एका नाल्याजवळ एक बिबट मृतावस्थेत आढळल्याची घटना बुधवारी (दि.१९) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, गावकऱ्यांनी घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील वडेगाव माल्ही परिसरातील नाल्यालगत असलेल्या मैदानावर माल्ही येथील मुले बुधवारी क्रिकेट खेळण्यासाठी गेली होती. दरम्यान, त्यांना नाल्यालगत एक बिबट मृतावस्थेत आढळला. त्यांनी याची माहिती सरपंच व गावकऱ्यांना दिली. यानंतर सरपंच व गावकरी घटनास्थळी पोहोचले व या घटनेची माहिती तिरोडा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. ज्या ठिकाणी बिबट मृतावस्थेत आढळला तो परिसर कोडेलाेहारा बीटअंतर्गत येत असून, या परिसरात वनविभागाची नर्सरी आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बिबट्याचा मृत्यू हा तीन चार दिवसांपूर्वीच झाल्याचे बोलले जाते. माल्हीचे सरपंच संजय रहांगडाले यांनी याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी आकरे यांना दिली. त्यांनी लगेच वनरक्षक व एका चौकीदाराला घटनास्थळी पाठविले होते. मात्र, सायंकाळी उशीर झाल्याने मृत बिबट्याचे श्ववविच्छेदन करण्यात आले नव्हते. त्यामुळे बिबट्याचे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.