शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोदलकसा पर्यटनस्थळी रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 01:17 IST

पर्यटन स्थळ विकास योजना अंतर्गत बोदलकसा येथे बोदलकसा पर्यटन स्थळ रेस्ट हाऊस रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

तिरोडा : पर्यटन स्थळ विकास योजना अंतर्गत बोदलकसा येथे बोदलकसा पर्यटन स्थळ रेस्ट हाऊस रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. सदर बांधकाम आठ लाख २९ हजार रूपये खर्चाचे आहे. याप्रसंगी आमदार रहांगडाले यांनी सांगितले, पर्यटन स्थळ विकास योजनेतून क्षेत्रामध्ये पर्यटन स्थळ विकसित व्हावे व पर्यटनाला वाव मिळावे. तसेच बोदलकसा, चोरखमारा व केरझरा हे पर्यटनस्थळ नागझिरा अभयारण्याला लागून असून या पर्यटनस्थळांचा विकास करणे गरजेचे आहे. चोरखमारा पर्यटनस्थळाच्या विकासासाठी शासनाकडे १४ कोटी रूपये व केरझरा पर्यटनाच्या विकासाकरिता सहा कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करून शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. जर या पर्यटन स्थळांचा विकास झाला तर पर्यटनाला वाव मिळेल व बाहेरील पर्यटकांची गर्दी वाढून येथील स्थानिक बेरोजगारांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल. यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करणे सुरू आहे, असे आ. रहांगडाले यांनी सांगितले.अध्यक्षस्थानी माजी आ. भजनदास वैद्य, माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, पं.स. सदस्य डॉ.बी.एस. रहांगडाले, रमणीक सयाम, पवन पटले, माया रहांगडाले, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, भाजप शहर अध्यक्ष सलाम शेख, कृऊबासचे मुख्य प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले, डॉ. वसंत भगत, संजयसिंह बैस, सरपंच प्रभा जांभुळकर, डॉ. दिलीप कोठीकर, डॉ. नन्हासिंग पटले, तालुका महामंत्री पिंटू रहांगडाले, मिलिंद कुंभरे, नीरज सोनेवाने, गणेश बघेले, निलेश बावनथडे, भुमेश्वर रहांगडाले, स्वानंद पारधी, कैलाश कटरे, सुधिर येळे तसेच गावकरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)