शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बीजीडब्ल्यूची इमारत स्ट्रक्चर आॅडिटमध्ये फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:20 IST

येथील बाई गंगाबाई महिला (बीजीडब्ल्यू) रूग्णालयाची इमारत फार जुनी असून ती आता जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात या इमारतीत पावसाचे पाणी साचल्याने रुग्णांचे हाल झाले होते.

ठळक मुद्देनवीन इमारतीत हलविणार रुग्णालय : जुनी इमारत पाडणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला (बीजीडब्ल्यू) रूग्णालयाची इमारत फार जुनी असून ती आता जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात या इमारतीत पावसाचे पाणी साचल्याने रुग्णांचे हाल झाले होते.दरम्यान या प्रकारानंतर प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर प्रशासनाने बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट केले. यात रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली ती पाडण्याची गरज असल्याचे म्हटले.त्यामुळे लवकरच ही इमारत पाडून नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकमेव शासकीय महिला व बाल रुग्णालय म्हणून बीजीडब्ल्यू रुग्णालय ओळखले जाते. जिल्ह्यासह जिल्हाबाहेरील महिला रुग्ण येथे उपचारासाठी येतात.या रूग्णालयाच्या बाह्यरुग्ण तपासणी विभागात दररोज चारशे ते पाचशे रुग्णांची तपासणी केली जाते. या रूग्णालयाच्या इमारतीला फार वर्ष झाली असून ही इमारत जीर्ण झाली आहे. या वर्षी पावसाळ्यात दोनदा रुग्णालयाच्या प्रसुती वार्डात गुडघाभर पाणी साचले होते.त्यामुळे येथे दाखल असलेल्या महिला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रात्र जागून काढावी लागली होती. दरम्यान ही बाब लोकमतने लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गांर्भियाने दखल घेत जिल्हा प्रशासनाला यावरुन चांगलेच फटकारले होते. तसेच या रुग्णालयात सुधारणा करुन गैरसोयी दूर करण्याचे निर्देश दिले होते.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने थोडीफार दुरूस्ती केली होती. मात्र रुग्णालयाची इमारत फार जुनी असल्याने इमारतीचे नागपूर येथील व्हीएनआयटीकडून स्ट्रक्चर आॅडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार व्हीएनआयटीने इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट केले त्यात इमारत जीर्ण झाली असून इमारतीचा पाया सुध्दा योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही इमारत पाडण्याचा निर्णय झाला. लवकरच या कामाला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.स्थानांतरणाच्या हालचाली सुरूगोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असून त्यासाठी इमारतीचे बांधकाम केले जात आहे. बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या शेजारीच एक इमारत तयार करण्यात आली आहे. या इमारतीचे सर्वच कामे आटोपले असून याच इमारतीत बीजीडब्ल्यू रुग्णालयाचे स्थानांतर करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने हालचाली सुध्दा सध्या सुरू आहे.बीजीडब्ल्यू रुग्णालयाची जुनी जीर्ण इमारत पाडून त्या ठिकाणी दुसरी इमारत उभारण्यात येणार आहे. तसेच तोपर्यंत याच रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या इमारतीत बीजीडब्ल्यू रुग्णालयाचे स्थानांतर करण्यात येईल.-व्ही.पी.रुखमोडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल