शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

८ कोटी रुपयांचा बेवारटोला प्रकल्प पोहोचला ३५ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST

........ धापेवाडा टप्पा दोनसाठी हवा १०० कोटी रुपयांचा निधी तिरोडा तालुक्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प समजल्या जाणाऱ्या धापेवाडा टप्पा दोन प्रकल्पाचे ...

........

धापेवाडा टप्पा दोनसाठी हवा १०० कोटी रुपयांचा निधी

तिरोडा तालुक्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प समजल्या जाणाऱ्या धापेवाडा टप्पा दोन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी १०० कोटी रुपयांची निधीची गरज आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास २८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार असून जवळपास २८ गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. टप्पा एकचे काम पूर्ण झाले असून टप्पा दोनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी महिनाभरापूर्वीच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली हाेती. त्याला मंत्री जयंत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली होती.

.......

झाशीनगर उपसा सिंचन केव्हा होणार पूर्ण

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले; मात्र उर्वरित ३० टक्के रखडले असल्याने ३०४५ हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी दोनदा भूमिपूजन सुद्धा करण्यात आले होते; मात्र बुडीत क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन आणि मोबदला देण्यावरुन या प्रकल्पाचे काम सुद्धा रखडले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला असता परिसरातील नागरिकांना दुबार घेण्यास मदत झाली असती. पण या प्रकल्पाचे सुध्दा भिजत घोंगडे कायम आहे.

.......

कंटगी व निमगाव प्रकल्प २५ वर्षांपासून रखडला

गोरेगाव तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकल्प, निमगाव लघु प्रकल्पाचे काम सुद्धा मागील २५ वर्षांपासून जमीन अधिग्रहण आणि झुडपी जंगलामुळे रखडले आहे. कटंगी प्रकल्पाचे काम बरेच पूर्ण झाले असून जमिनी अधिग्रहण करण्यावरुन या प्रकल्पाचे घोडे अडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीपासून वंचित राहावे लागत आहे.

.....

रिक्त पदांचा सिंचन निर्मितीवर परिणाम

गोंदिया सिंचन विभागात मागील एक दोन वर्षांपासून एकूण ८२६ मंजूर पदांपैकी केवळ १६८ पदे भरली असून जवळपास ८० टक्के पदे रिक्त आहेत. याचा सुद्धा सिंचन निर्मितीवर परिणाम होत आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख २३ हजार १९८ हेक्टर लागवड क्षेत्र असून सद्यस्थितीत केवळ १ लाख १६ हजार हेक्टर सिंचन निर्मिती होत आहे.

.......

कोट

गावालगत मोठे सिंचन प्रकल्प असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी या प्रकल्पांचा कसलाच उपयोग होत नाही. या प्रकल्पाचे पाणी मिळाले असते तर दुबार पीक घेऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करता आली असती.

- निहारीलाल दमाहे, शेतकरी, लोधीटोला

......

कटंगी मध्यम प्रकल्पाचे काम जमिनी अधिग्रहणामुळे मागील २५ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.

- देवालाल बिसेन, शेतकरी

......

सिंचन प्रकल्पाची कामे वर्षानुवर्षांपासून रखडली असल्याने शेतकऱ्यांसाठी हे प्रकल्प केवळ नाममात्र ठरत आहे. त्यामुळे या प्रकल्पांची कामे त्वरित मार्गी लावण्याची गरज आहे.

- राधेश्याम मेश्राम, शेतकरी.

............