शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार! चिखलाने माखलेला ट्रॅक्टर रस्त्यावर आणाल तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST

देवरी : चिखलाने माखलेल्या रस्त्यावर, कोणतेही वाहन घसरून वाहन चालकाचा जीव जाऊ शकतो. रस्ते हे सुखकर प्रवासासाठी असतात. त्यामुळे ...

देवरी : चिखलाने माखलेल्या रस्त्यावर, कोणतेही वाहन घसरून वाहन चालकाचा जीव जाऊ शकतो. रस्ते हे सुखकर प्रवासासाठी असतात. त्यामुळे रस्त्यावर चिखलाने माखलेले ट्रॅक्टर आणता कामा नये; अन्यथा अशा ट्रॅक्टर चालक- मालकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली आहे.

तालुक्यातील सर्व तलाठी व ग्रामसेवकांना आपल्या हद्दीतील ट्रॅक्टर मालकांना सूचना देण्याविषयीचे लेखी आदेश तहसीलदार देवरी यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत. पावसाळ्याच्या तसेच रब्बी हंगामात ट्रॅक्टर चालक हे शेतात चिखलणी करून चिखलाने माखलेले ट्रॅक्टर मुख्य मार्गावर आणत असतात. त्यामुळे ट्रॅक्टरला लागलेला चिखल हा रस्त्यावर येतो. बहुधा या चिखलाने संपूर्ण रस्ता माखलेला असतो. परिणामी, रस्ता निसरडा होऊन अनेक वाहनांना अपघात होण्याची दाट शक्यता असते. ट्रॅक्टर चालकाच्या अशा चुकांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्व ट्रॅक्टरचालकांनी शेतात चिखलणी केल्यानंतर आपले वाहन पाण्याने धुतल्यानंतरच मुख्य मार्गावर आणावे; अन्यथा संबंधित वाहन चालक-मालक यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यातील सर्व तलाठी आणि ग्रामसेवक यांना यासंबंधी कारवाई करण्याचा लेखी आदेश नुकताच देण्यात आला आहे.