शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

खबरदार... वाहन रस्त्यावर ठेवले तर..

By admin | Updated: November 29, 2015 02:38 IST

जिल्ह्यातील सर्वच रस्ते अरूंद असताना रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर आता केवळ दंड न करता ...

वाहतूक पोलिसांची मोहीम : दोन दिवसात २० वाहन चालकांवर गुन्हे दाखलगोंदिया : जिल्ह्यातील सर्वच रस्ते अरूंद असताना रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर आता केवळ दंड न करता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस विभागाने सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसात २० वाहनचालकांवर यानुसार या कारवाई करण्यात आली. रस्याचे नियम तोडणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यान्वये दंड आकारून वाहन चालकांना सोडले जाते. परंतु कारण नसताना तासनतास रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीची कोंडी करणाऱ्या वाहन चालकांना दंड आकारून चालणार नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यास ‘त्यांचे डोके ठिकाणावर येईल’ अशी भूमिका पोलीस विभागाने घेतली आहे. त्यातूनच भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा दाखल करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. त्यामुळे आता रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्यांची खैर नाही असा संदेश जिल्हाभरात जात आहे. पोलीस विभागाने वाहतुक अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सुरू केलेली ही मोहीम अत्यंत महत्वाची आहे. मागील दोन दिवसात जिल्ह्यात अनेक आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोना टॉकीज समोर उभ्या असलेल्या एमएच ३५ टी ३१ या वाहनाचा चालक विलास तुळशीराम गजभिये (४९) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य रस्त्यावर असलेल्या एमएच २६ एक्स ५७५३ चा वाहन चालक कान्हा रामानंद सुलाखे गौतमनगर गोंदिया याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोंडमोहाळी येथे उभा असलेल्या एमएच ३५ एम ४१५ चा टाटासूमो चालक रफिक मोहरम शेख (३७) रा. गोंडमोहाळी, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या साखरीटोला येथील रस्त्यावर उभा असलेल्या आॅटो क्रमांक एमएच ३५ के १६९१ चा चालक श्रीराम टिकाराम डोये (४२) रा. अंजोरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर उभ्या असलेल्या दोन ट्रक चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. सीजी ०८ एसबी ५२८६ चा चालक रविसिंग सोहनसिंग राजपूत रा. बोरतलाव डोंगरगढ जि. राजनांदगाव तसेच सीजी ०७ सी ६६८१ चा चालक आशिष रिजाय खान (३६) रा. संजयनगर वॉर्ड क्रमांक १ देवरी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आमगाव पोलिसांनी एमएच ३५ के २१४९ चा चालक महेंद्र प्रमोद वंजारी (२०) रा. ठाणा, एमएच ३५ के ८८२९ चा चालक भागवत फुलचंद दसहरे (२९) रा. कुल्पा ता. लांजी, जि. बालाघाट या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया शहराच्या जयस्तंभ चौकातील दोन वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंदियाच्या श्रीनगरातील दुर्गेश नवाज सहारे (२६) याने काळीपिवळी एमएच ३५ के १६५५ हिला रस्त्यावर ठेवले होते. तर संपत संभाजी रहांगडाले (४३) रा. अदानी याने आॅटो क्रमांक एमएच ३५ के १७५५ या वाहनाला रस्त्यावर ठेवून वाहतुकीस अडथळा केला होता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी फुलचूरटोला रस्त्यावर उभा असलेला ट्रक सीजी ०४ जे ८१३१ चा चालक वहीद शहीद खान (३६) रा.फुलचूरटोला, सीजी ०८ बी २९३ चा चालक जावेद साहेब अली (२७) रा. फुलचूरटोला गोंदिया या वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तिरोडा पोलिसांनी एमएच ३५/४७० चा आॅटोचालक नितीन कृष्णा बिसेन (२८) रा. मेंढा, उसर्रा येथील संजय विश्वनाथ राऊत (२९) याने एमएच ३५/१२८५ हे वाहन रस्त्यावर ठेवले होते. रामनगर पोलिसांनी रेल्वे तिकीट घरासमोर उभी असलेली काळीपिवळी एमएच ३६/३११२ चा चालक सुनील प्रकाश हरके (३०) रा. दांडेगाव, आमगाव पोलिसांनी जगनाडे चौकात उभा असलेला ट्रक एमएच ३१ सीके ८७५३ चा चालक दिलीपकुमार बाबुलाल कोल्हे (४८) रा. नागपूर , दवनीवाडा पोलिसांनी धापेवाडा येथे उभा असलेला एमएच २६ एल ०१६१ चा वाहनचालक चंद्रशेखर पुरणलाल हरिणखेडे (४२) रा. नवेगाव, परसवाडा येथे उभ्या असलेल्या एमएच ३५/३४५८ टाटा मॅजिकचा चालक आरिफ रज्जाक खान पठाण (३२) रा. परसवाडा, साखरीटोला येथे उभा असलेला वाहन आॅटो एमएच ३५/३०५५ चा चालक रहमतुल्ला अब्दुल्ला खान (६७) रा. रिसामा, एमएच ३५/३२४४ या आॅटोचा चालक केवलचंद सोमाजी हत्तीमारे (२७) रा. जवरी या वाहनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)