शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सावधान...डेंग्यूचा व्हायरस बदलतोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात डेंग्यूचे टाइप १ आणि ३ चे रुग्ण अधिक आढळत होते. मात्र, यंदा प्रथमच जिल्ह्यात डेंग्यूचे टाइप २ प्रकाराचे रुग्ण आढळले. त्यामुळे डेंग्यूचा व्हायरस आता बदलत असून नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. दोन ते तीन दिवस ताप असल्यास अथवा डेंग्यूच्या संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसत वेळीच जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करून घ्यावा.

अंकुश गुंडावार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील महिन्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. गोंदिया, सालेकसा या भागात डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळले होते. मात्र, आरोग्य विभागाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे ही या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव आता आटोक्यात आला. गोंदिया जिल्ह्यात डेंग्यूचे टाइप १ आणि ३ चे रुग्ण अधिक आढळत होते. मात्र, यंदा प्रथमच जिल्ह्यात डेंग्यूचे टाइप २ प्रकाराचे रुग्ण आढळले. त्यामुळे डेंग्यूचा व्हायरस आता बदलत असून नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. दोन ते तीन दिवस ताप असल्यास अथवा डेंग्यूच्या संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसत वेळीच जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करून घ्यावा. डेंग्यूच्या टाइप २ च्या रुग्णांचे प्रमाण जिल्ह्यात कमी असले तरी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तर वेळीच सावध होत उपचार घेण्याची गरज आहे.

हे बदल काळजी वाढविणारे ताप नसताना पॉझिटिव्ह ताप, डोकेदुखी, डोळे लालसर होणे, खाज सुटणे, अशक्तपणा वाटणे ही डेंग्यूची लक्षणे असली तरी लक्षणे दिसत नसताना सुद्धा डेंग्यूची चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. जिल्ह्यात सुद्धा लक्षणे नसलेले तीन ते चार रुग्ण आढळले आहे.प्लेटलेट्स कमी नाही तरी पाॅझिटिव्ह डेंग्यूची लागण झाल्यानंतर साधारणत: बऱ्याचे रुग्णांचे प्लेटलेट्स कमी होतात. मात्र, काहींना या आजाराची लागण झाल्यानंतरही त्यांचे प्लेटलेट्स कमी होत नसल्याचे डॉक्टर आणि पॅथाॅलाॅजीच्या तज्ज्ञांनी सांगितले. डेंग्यूचा २ टाइप हा प्रकार थोडा धोकादायक आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. 

टाईप २ चे प्रमाण कमी डेंग्यूची लागण झाल्यानंतर प्लेटलेट्स कमी होणे गरजेचे नाही. बऱ्याच रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती ही चांगली असते त्यामुळे अशा रुग्णांचे प्लेटलेट्स कमी होत नसतात. प्लेटलेट्स चांगले असणाऱ्यांचा पण डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह येऊ शकते. असे बऱ्याच रुग्णांचे रिपोर्ट तपासल्यानंतर पुढे आले आहे.- सपन उजवणे, पॅथाॅलॉजिस्ट

जिल्ह्यात डेंग्यूचे टाइप १ आणि ३ चे अधिक रुग्ण आढळत होते. मात्र, यंदा टाइप २ च्या रुग्णांमध्ये थोडी वाढ झाली आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियाचा संसर्ग आटोक्यात असून आरोग्य विभागातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. - डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक

 

टॅग्स :dengueडेंग्यू