शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बेवारटोला सिंचन प्रकल्प मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:13 IST

रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हे भाजप सरकारचे मुख्य ध्येय व धोरण आहे. त्यादृष्टीने राज्यात आणि देशात मागील साडेचार वर्षांत अनेक कामे करण्यात आली. या परिसरातील बेवारटोला सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. परिणामी शेकडो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर करुन हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

ठळक मुद्देनितीन गडकरी : कचारगड विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हे भाजप सरकारचे मुख्य ध्येय व धोरण आहे. त्यादृष्टीने राज्यात आणि देशात मागील साडेचार वर्षांत अनेक कामे करण्यात आली. या परिसरातील बेवारटोला सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. परिणामी शेकडो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर करुन हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे कोया पुनेम महोत्सव व राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन आज (दि.१८) आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम, पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. अशोक नेते, आ.संजय पुराम, विजय रहांगडाले, डॉ.परिणय फुके, देवराव होळी, अशोक उईके, माजी आ.हेमंत पटले, खुशाल बोपचे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल व समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, बेवारटोला सिंचन प्रकल्पासह कुवाढास कालव्याचे काम रेल्वे विभागाच्या परवानगी अभावी अनेक वर्षांपासून रखडले असल्याची बाब आ.संजय पुराम यांनी निदर्शनास आणून दिली. खा.अशोक नेते आणि पुराम यांनी यासंबंधी कुठली अडचण आहे याचा प्रस्ताव आपल्याकडे त्वरीत सादर करावा. रेल्वे मंत्र्यांशी बोलून कुवाढास कालव्याची समस्या सुध्दा मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिली.समस्त आदिवासी आणि गोंडी समाजबांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्रीे देवेंद्र फडणवीस यांनी विकासात्मक आराखडा तयार करुन या क्षेत्राचा सर्वांगिन विकास करण्याचे आश्वासन दिले आहे. याबद्दल आपण सुध्दा त्यांचे अभार मानतो. कचारगड तीर्थ आणि पर्यटन स्थळाच्या विकासासाठी जेवढा निधी लागेल तेवढा केंद्र व राज्याच्या माध्यमातून उपलब्ध करुन देऊन देशातील सर्वोकृष्ट पर्यटन व तीर्थस्थळ म्हणून या परिसराचा विकास करण्याची ग्वाही गडकरी यांनी दिली. ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आ.डॉ.परिणय फुके यांच्या पुढकाराने अटल आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आरोग्य विषयक सर्व तपासण्या करुन नि:शुल्क औषधे दिले जात आहे. तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांवर शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध करुन दिली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन सुध्दा त्यांनी या वेळी केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करुन देऊन त्यांचा सर्वांगिन करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरु आहेत.यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. गोंडी संस्कृती फार प्राचीन असून या संस्कृती आणि वारसाचे जतन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने निश्चितच उपाय योजना करण्यात येईल अशी ग्वाही दिली. या वेळी राजकुमार बडोले, संजय पुराम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी मांडले.अटल आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांची तपासणीकोया पुनेम महोत्सवानिमित्त कचारगड येथे आयोजित यात्रेचे औचित्य साधून आ.डॉ.परिणय फुके यांच्या पुढाकाराने व जिल्हा आरोग्य व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने अटल आरोग्य शिबिर सोमवारी (दि.१८) कचारगड येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नि:शुल्क आरोग्य तपासणी व उपचाराची सोय एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात आली होती. यात हजारो रुग्णांची आरोग्य तपासणी करुन उपचार व नि:शुल्क औषधांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे प्रथमच यात्रा स्थळी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आल्याने अनेक रुग्णांना मदत झाली.